घरताज्या घडामोडीपवई तलाव ओव्हरफ्लो, तरीही मुंबईकरांची पाणी चिंता कायम!

पवई तलाव ओव्हरफ्लो, तरीही मुंबईकरांची पाणी चिंता कायम!

Subscribe

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावापैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा  बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव आज  पहाटे ६ वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. ५४५ कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी हे मानवाला पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी वापरले जाते. गेल्या तीन दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

धुवाधार पावसामुळे पवई तलाव ओव्हरफ्लो!

धुवाधार पावसामुळे पवई तलाव ओव्हरफ्लो!

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Sunday, July 5, 2020

- Advertisement -

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे २७ किलोमीटर (सुमारे १७ मैल) अंतरावर हा तलाव आहे. या कृत्रिम तलावाचे बांधकाम सन १८९० मध्ये पूर्ण झाले. या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे १२.५९ लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता. या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६.६१ चौरस किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे २.२३ चौरस किलोमीटर एवढे असते. या तलावाची पूर्ण भरून वाहण्याची पातळी ही १९५ फूट आहे. तलाव पूर्ण भरलेला असताना तलावामध्ये ५४५.५ कोटी लीटर पाणी असते. (५,४५५ दशलक्ष लिटर) हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळते.

मुंबईमध्ये गेले दोन दिवस सुरु असलेल्या पावसाने रविवारी सकाळपासून आणखीनच जोर धरला आहे.  शनिवार- रविवार मुंबईमध्ये हायअलर्ट देण्यात आलेला आहे. मुंबईसह नवी मुंबई रायगड, पालघर, ठाणे या विभागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. काल रात्री मुंबईला मुसळधार पावसाने झोडपल्यानंतर आज देखील अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. आज मुंबईत साडेबाराच्या सुमारास भरतीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणूनच महापालिकेने २४ विभागांना दक्षतेचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – Video : मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरूच, हायटाईडची शक्यता!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -