घरमुंबईमुंबई पॉवरकट अपडेट : सर्व ठिकाणी ५ वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होणार

मुंबई पॉवरकट अपडेट : सर्व ठिकाणी ५ वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होणार

Subscribe

तुमच्या घरात वीज आली ? मुंबईचा वीज पुरवठा रिस्टोरेशन मोडमध्ये

महापारेषणच्या ४०० के. व्ही. कळवा-पडघा भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) केंद्रात सर्किट-१ ची देखभाल दुरूस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट-२ वर होता. मात्र, सर्किट-२ मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील काही भागात वीजपुरवठा खंडित झाला. दरम्यान, महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी युध्दपातळीवर काम करून काही भागात वीजपुरवठा पूर्ववत केला.

मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या कळवा, पडघा, खारघर ट्रान्सफॉर्मर वाहिनी बंद झाल्या. मुंबई व मुंबई उपनगरचा २२०० मेगावॅट वीजपुरवठा खंडित झाला. उरण वायू विद्युत केंद्रातील सर्व संच एससी बिघाड झाल्याने बंद झाला. खारघर-तळोजा वाहिनी बंद झाली. दरम्यान, महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने ती वाहिनी पूर्ववत केली. दरम्यान, कळवा-खारघर येथील जंपर ब्रेकडाऊन झाला, हा वीज पुरवठा दुपारी अडीच वाजता सुरू करण्यात आला.

- Advertisement -

त्याआधी ४०० के. व्ही. कळवा-तळेगाव पॉवरग्रीड वाहिनी १० ऑक्टोबरला दुपारी १ वाजून ४७ मिनिटाला बाधित झाली होती. ४०० के. व्ही. पडघा-कळवा वाहिनी-१ ही १२ ऑक्टोबरला पहाटे ४ वाजून ३३ मिनिटाला ओव्हर व्होल्टेजमुळे बंद झाली. इन्सुलेटर बदलण्यासाठी सदर वाहिनी बंद ठेवण्यात आली. ४०० के. व्ही. पडघा-कळवा वाहिनी-२ सकाळी १० वाजून १ मिनिटांनी डिस्टन्स प्रोटेक्शन बिघाड झाल्याने बंद झाली. मनोरा लोकेशन क्रमांक-१००७ येथे वाहिनी तुटून पडली होती. मोठ्या प्रमाणात ठिणग्या आढळून आल्याने ४०० के. व्ही. तळेगाव पॉवरग्रीड- वाहिनी खारघर येथून सकाळी १० वाजून २ मिनिटांनी बंद करण्यात आली.

यामुळे कळवा व खारघर येथील ४०० के. व्ही. च्या दोन्ही बस शून्य भारीत (Zero Load) झाल्या. ज्यामुळे मे. टाटाकडून संच क्र. ५ (५०० मेगावॉट) चा वीजपुरवठा बंद झाला. तसेच बोईसर पॉवरग्रीड ची २२० के. व्ही. पुरवठा वाहिनी क्र. ३ सुध्दा सकाळी १० वाजून ५ मिनिटांनी बंद झाली. त्यामुळे मे. टाटा यांचा सुमारे ५७० मेगावॉट व मे. बेस्ट यांचा ४४० मेगावॉट बंद झाला. यामुळे मे. अदानी यांच्या परिक्षेत्रातील ७०० मेगावॉट वीजभार बंद झाला. वीजपुरवठा सुरळीत करण्याचे कामसुध्दा युध्दपातळीवर सुरू आहे. ट्रॉम्बे बस ऊर्जित केली असून वीज निर्मिती सुरू करण्यात येत आहे. तसेच रेल्वेचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. संपूर्ण वीजपुरवठा सुरळीत करण्यास सायंकाळचे पाच वाजतील, अशी शक्यता आहे.

- Advertisement -

कुठे कुठे आली वीज ?

आम्ही मुंबई आयलॅंड सिस्टिम कार्यरत करण्यासाठी यशस्वी झालो. आम्हाला आणखी विजेची गरज होती, पण त्यासाठी आम्ही ग्रीडवरच अवलंबून होतो. अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडच्या उपनगरातील बहुतांश भागात आम्ही वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे एईएमएलने स्पष्ट केले. तर मुंबईतील ९० टक्के भागात वीज पुरवठा सुरळीत झाला आहे अशी माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली. तर टाटा पॉवरने दिलेल्या माहितीमध्ये ३ हायड्रो स्टेशनच्या माध्यमातून वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे असे सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -