घरमुंबईनालासोपारा काबीज करण्यासाठी प्रदीप शर्मांनी नेमला 'चाणक्य'

नालासोपारा काबीज करण्यासाठी प्रदीप शर्मांनी नेमला ‘चाणक्य’

Subscribe

निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी मुद्द्यांसोबतच प्रभावी प्रचारतंत्र वापरण्याची पद्धत आता रुढ झाली आहे. शिवसेनेने प्रशांत किशोर यांच्यासोबत करार केला असतानाच उमेदवार वैयक्तिक पातळीवर राजकीय रणनीतीकारांसोबत करार करत आहेत.

एन्काऊंटर स्पेशालिस्ट आणि विद्यमान खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा हे विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. अंधेरी मतदारसंघात उमेदवारी मिळत नसल्यामुळे शर्मांनी नालासोपारामधून निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली आहे. नालासोपारा मतदारसंघात मराठी आणि अमराठी असे बहुभाषिक मतदार आहेत. मतदारसंघातील समस्या, सामाजिक परिस्थिती, राजकीय गणिते आणि प्रचाराच्या मुद्द्यांवर माहिती गोळा करण्यासाठी प्रदीप शर्मा यांनी मागील काही महिने पडद्याआडून काम सुरु केले आहे.

प्रदीप शर्मा यांना शिवसेनेकडून नालासोपारा मतदारसंघात उमेदवारी मिळणार, असे वृत्त आपलं महागनरने याआधीच दिले आहे. भाजपच्या कोट्यातून मुंबई उपनगरात तिकीट मिळणे अशक्य असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सल्ल्यानुसार शर्मा यांना नालासोपाराचा पर्याय देण्यात आला आहे. शर्मा यांनी नालासोपारामधून निवडणूक लढवावी असे ठाण्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांची इच्छा होती. दोघांनीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मन वळवून शर्मा यांना नालासोपारा मतदारसंघाची उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न केले. याबाबत अधिकृत घोषणा होण्याआधी प्रदीप शर्मा यांनी राजकीय रणनीतीकार वरुण सुखराज यांच्या एजन्सीला निवडणूक प्रचारक म्हणून नेमले आहे

- Advertisement -

हे वाचा – प्रदीप शर्मा शिवसेनेच्या तिकीटावर नालासोपार्‍यातून

नालासोपारा, वसई, विरार परिसरात गेली ४ दशके भाई ठाकूर, हितेंद्र ठाकूर यांचे वर्चस्व आहे. ठाकूर यांची एकाधिकारशाही मोडण्यासाठी शर्मा यांना पुढे केले जात असल्याचे बोलले जात आहे. प्रदीम शर्मा हे पोलीस सेवेत असताना एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून प्रसिद्ध होतेच शिवाय ते उत्तर भारतीय आहेत. त्यामुळे नालासोपारा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात असलेल्या उत्तर भारतीय मतांना ते आकर्षित करु शकतात, अशीही अटकळ बांधली जात आहे.

- Advertisement -

कोण आहे वरून सुखराज?

वरुण सुखराज हे राजकीय रणनीतीकार म्हणून काम करतात. २०१७ साली त्यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये समाजवादी पार्टीसाठी कॅम्पेन केले होते. महाराष्ट्रातील काही प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रचाराची जबाबदारी देखील त्यांच्याकडे आहे. शिवसेनेने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रशांत किशोर यांच्यासोबत करार केलेला आहे. तर इतर उमेदवार वैयक्तिक पातळीवर रणनीतीकार नेमत असतात. प्रदीम शर्मा यांना मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न, विरोधी उमेदवार यांची माहिती देण्याचे काम कबुतर डायलॉग करणार आहे. त्याचबरोबर प्रदीम शर्मा यांच्या ‘सुपर कॉप’ इमेजचा वापर करून प्रभावी कॅम्पेन राबविण्यासाठी कबुतरचे वरूण सुखराज काम करणार असल्याचे समजते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -