प्रविण आष्टीकर यांनी स्विकारला भिवंडी महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार

भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान आयुक्त मनोहर हिरे सेवानिवृत्त झाले. त्यामुळे आयुक्तपदासाठी रस्सीखेच सुरु होती.

Bhiwandi
Pravin Ashtikar accepted the post of Bhiwandi Municipal Commissioner
प्रविण आष्टीकर

भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान आयुक्त मनोहर हिरे हे ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे त्यांच्या रिक्तपदावर नियुक्ती व्हावी यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून रस्सीखेच सुरु होती. मात्र आज पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रविण आष्टीकर यांनी पालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारला. त्यामुळे तूर्तास आयुक्त पदाच्या खुर्चीच्या संगीत खेळास विराम मिळाला आहे.

हेही वाचा – बदलापूरमध्ये शिवसैनिकांनी स्वतःच्या नगरसेवकाचे कार्यालय तोडले!

मनोहर हिरे यांच्या सेवानिवृत्तीनंतर आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार उल्हासनगर पालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आला होता. त्यानंतर लगेचच पंधरा दिवसांनी अतिरिक्त आयुक्त अशोककुमार रणखांब यांच्याकडे आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. रणखांब ३० ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त होत असल्याने तोपर्यंत त्यांना आयुक्तपदी ठेवण्यात येईल, असे पालिका वर्तुळात बोलले जात होते. मात्र असे असतानाच राज्याच्या नगरविकास मंत्रालयाने १६ ऑगस्ट रोजी अचानक पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रविण आष्टीकर यांची नेमणूक केली. त्यानंतर २६ दिवसांनी प्रविण आष्टीकर यांनी आज बुधवारी पालिका आयुक्तपदाचा पदभार स्विकारून कामकाज सुरु केले आहे. त्यामुळे आता भिवंडी महापालिकेच्या आयुक्त पदाच्या संगीत खुर्चीचा खेळ तूर्तास थांबला आहे.