घरमुंबईरशियातील बालसाहित्यावर आधारित 'धुक्यात हरवले लाल तारे'

रशियातील बालसाहित्यावर आधारित ‘धुक्यात हरवले लाल तारे’

Subscribe

रशियातील बालसाहित्याचा मराठी आणि इतर भारतीय भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला आहे त्यावर 'धुक्यात हरवले लाल तारे' हा लघुपट शनिवारी दाखवण्यात येणार आहे.

सोव्हिएट आणि रशियातील बालसाहित्याचा मराठी आणि इतर भारतीय भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला आहे. त्यावर आधारित ३९ मिनिटांच्या ‘धुक्यात हरवले लाल तारे’ (रेड स्टार्स लॉस्ट बिहाईण्ड दी मिस्ट) या लघुपटाचा गोदरेज आर्काईव्हजतर्फे भारतात प्रीमियर होणार आहे. शनिवार, २१ जुलै २०१८ रोजी दुपारी ३ वाजता गोदरेज ऑडिटोरियम, विक्रोळीमध्ये हा लघुपट दाखविण्यात येणार आहे. हा लघुपट मराठीत असून त्यांना इंग्रजीत सबटायटल देण्यात आले आहेत. नव्या पीढीला या पुस्तकांची कथा सांगण्याबरोबरच आधीच्या पिढ्यांना त्यांच्या बालपणीच्या पुस्तकांची नव्याने झलक घडविण्याचा तसेच सध्याच्या काळात मुलांच्या साहित्यावरील चर्चेला प्रोत्साहन देण्याचा उद्देश यामागे असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

रत्नाकर मतकरी करणार उद्घाटन

प्रसिद्ध मराठी लेखक-नाटककार तसंच बालसाहित्यातील मौल्यवान योगदानाबद्दल साहित्य अकदामी पुरस्काराने गौरविलेले रत्नाकर मतकरी या लघुपटाच्या प्रदर्शनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. हा लघुपट तयार करणारे प्रसाद देशपांडे, निखिल राणे आणि देवदत्त राजाध्यक्ष हे यावेळी उपस्थित राहणार असून ते या लघुपटाबद्दल आपली मतं मांडणार आहेत. या लघुपटाच्या प्रदर्शनानंतर चर्चेचा कार्यक्रम होणार असून या चर्चेत बालसाहित्य प्रकाशक संध्या टाकसाळे, मार्गी शास्त्री, लेखिका आणि सहयोगी प्राध्यापक डॉ. मोनिका खन्ना, रशियन भाषेच्या सुविधादार तेजस्विनी मोडक यांचा सहभाग असणार आहे. हे व्यासपीठ म्हणजे बालसाहित्य आणि मुलांच्या वाचनसवयीला प्रोत्साहन देण्याबाबतच्या चर्चेचे माध्यम असेल. लघुपटाचे प्रदर्शन नि:शुल्क असून ते सर्वांसाठी खुलं असून १२ वर्षांहून अधिक वयोगटासाठी हे प्रदर्शन असणार आहे. दरम्यान आपल्या मुलांना बालसाहित्याची नव्यानं ओळख करून देण्यासाठी हे प्रदर्शन नक्कीच प्रोत्साहन देईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -