आम्ही कामदार आहोत, नामदार नाहीत – मोदी

जेव्हा लोकशाहीचा गोळा घोटणारे लोकशाही वाचवण्यासाठी भाषा करतात, तेव्हा देशाच्या जनतेलाही आश्चर्य वाटतं. असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर लगावला आहे.

Mumbai
prime minister narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी

विरोधकांची आघाडी माझ्याविरोधात नव्हे, तर देशवासीयांच्या विरोधात आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना लक्ष्य केलं आहे. ‘आमचं सरकार एका कुटुंबासाठी काम करत नाही. भारत हा जगातील सर्वोत्तम देश व्हावा, असं आम्हाला वाटतं. त्यामुळे आम्ही १३० देशवासीयांसाठी काम करत आहे. त्यामुळे आमचं संपूर्ण लक्ष कामावर आहे. कारण आम्ही कामदार आहोत, नामदार नाहीत’, असं म्हणतं मोदींनी काँग्रेसला टोला लगावला आहे’. ‘जेव्हा लोकशाहीचा गोळा घोटणारे लोकशाही वाचवण्यासाठी भाषा करतात, तेव्हा देशाच्या जनतेलाही आश्चर्य वाटतं. असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर लगावला आहे. राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयाचे उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते.

विरोधकांच्या एकजुटीवर मोदींची टीका

पश्चिम बंगालच्या कोलकाता शहरात शनिवारी भाजप विरोधात ‘महा’शक्तीप्रदर्शन करण्यात आले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या तृणमूल काँग्रेस या पक्षाद्वारे आज एका महासभेचे आयोजन केले आहे. या सभेसाठी देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या सर्व नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं असून या महासभेत शरद पवार, चंद्राबाबू नायडू, देवेगौडा, एम.के. स्टॅलीन, अखिलेश यादव यांच्यासह अनेक बड्या राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती. या विरोधकांच्या एकजुटीवर मोदींनी जोरदार टीका केली आहे.

भ्रष्टाचाराविरोधात मी कठोर पावलं उचलली

‘आज पश्चिम बंगालमध्ये सर्व भ्रष्ट राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. आम्ही भ्रष्टाचाराविरोधात मोहीम सुरु करताच काँग्रेसला भीती वाटू लागली आहे आणि महाआघाडीचे प्रयत्न सुरु झाले आहेत. भ्रष्टाचाराविरोधात मी कठोर पावलं उचलली आहेचं. त्यामुळे काही पक्ष नाराज आहेत आणि ते होणे नैसर्गिकच आहे. त्यांना आता पूर्वीसारखी पैशांची लूट करता येत नाही. त्यामुळे आता त्यांनी एकत्र येत महाआघाडी केली आहे. ही आघाडी माझ्याविरोधात नव्हे, तर देशाच्या जनतेविरोधात आहे. अद्याप आघाडी पूर्णपणे तयारही झालेली नाही. मात्र तरीही आपल्या वाट्याला काय येणार, यासाठी सौदेबाजी सुरु आहे’, असा ही घणाघात मोदींनी केला आहे.

वाचा – भारतीय चित्रपट संग्रहालयाचे मोदींच्या हस्ते उद्घाटन

वाचा – भाजप विरोधात कोलकातामध्ये ‘महा’शक्तीप्रदर्शन; नेत्यांची एकजूट

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here