घरमुंबईविद्यार्थ्यांची व्यसनाधीनता रोखताना शाळांची ‘परीक्षा’!

विद्यार्थ्यांची व्यसनाधीनता रोखताना शाळांची ‘परीक्षा’!

Subscribe

मुंबईतील शाळकरी विद्यार्थ्यांच्या हाती आढळून येत असलेल्या पेन हुक्क्याच्या वृत्ताने सोमवारी शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेली व्यसनधीनता रोखताना शिक्षकांची दमछाक होत आहे.

मुंबईतील शाळकरी विद्यार्थ्यांच्या हाती आढळून येत असलेल्या पेन हुक्क्याच्या वृत्ताने सोमवारी शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेली व्यसनधीनता रोखताना शिक्षकांची दमछाक होत आहे. विद्यार्थ्यांकडे असलेल्या अमली पदार्थ तपासण्यासाठी कोणतीच यंत्रणा नसल्याने विद्यार्थ्यांना मोकळं रान मिळत आहे, असे महागनरच्या सर्व्हेक्षणात दिसून आले आहे. विशेष म्हणजे, महानगरमधील या वृत्तानंतर मुंबई मुख्याध्यापक संघटनेने याची गंभीर दखल घेतली आहे. अशा प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी विशेष मोहीम सुरु करण्यात येणार आहे.

मुंबईतील शाळकरी विद्यार्थी पेन हुक्क्याच्या जाळ्यात अडकल्याचे गंभीर वृत्त आपलं महानगरने मंगळवारी प्रकाशित केले. या वृत्तानंतर शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून पालकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. पेन हुक्का बरोबरच अन्य प्रकारच्या व्यसनांचे प्रमाण वाढल्याची माहितीही समोर आली आहे. यात साधारणपणे बाम, पावडर आणि सध्या विशेष प्रकारच्या जेली वापरण्यात येतात. यासाठी विद्यार्थी वेगवेगळ्या आयडियाच्या कल्पना लढवित आहेत. पण हे तपासणार कसे असा प्रश्नचिन्ह यावेळी शिक्षकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. यासाठी कोणतीही यंत्रणा किंवा प्रशिक्षण शिक्षकांना नाही.

- Advertisement -

दरम्यान, या सर्व प्रकाराबाबत बोलताना मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये व्यसनधीनता कमी व्हावी यासाठी आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवितो. पण हायटेक पेन हुक्क्याचा प्रकार खरंच खूप गंभीर आहे. त्यामुळे आता याविरोधात आम्ही विशेष मोहीम सुरू करणार आहोत. आगामी काळात विद्यार्थ्यांच्या दप्तरांची बारकाईने तपासणी करण्यात येईल. पालकांनादेखील याबाबत जागृत करण्यात येईल. पण शाळेबाहेरही या गोष्टींना आळा घालण्याची गरज आहे. त्यासाठी प्रशासनाने शाळेच्या परिसरात पेन हुक्का आणि इतर वस्तूंवर प्रतिबंध घालायला हवा, असे मत मुख्याध्यापकांनी व्यक्त केले.

शाळांनी तयार केलेत व्हिडीओ
दरम्यान, पेन हुक्का आणि इतर व्यसनांपासून विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यासाठी शाळांनी गंभीर पावले उचलण्यास सुरुवात केली आहेत. यासाठी आता शाळांनी युट्यूब आणि इतर माध्यमांतून जागृती करण्यासाठी एक विशेष व्हिडीओ तयार केला आहे. हा व्हिडीओ विद्यार्थ्यांना आणि पालकांना दर महिन्यातून एकदा दाखविण्यात येतो, अशी माहिती मुंबईतील अनेक मुख्याध्यापकांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -