घरमुंबईहजारो किलोमीटरचा प्रवास करून प्रिसिलियाने उभारला लाखोंचा निधी!

हजारो किलोमीटरचा प्रवास करून प्रिसिलियाने उभारला लाखोंचा निधी!

Subscribe

मुलींना शिकता यावे म्हणून पनवेल ते कन्याकुमारी असा तब्बल ४ हजार ४०० किलोमीटरचा सायकलने प्रवास करणारी २५ वर्षीय प्रिसिलीया मदन ही आजच्या काळातली सावित्रीबाईंची लेक ठरली आहे.

सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा पुढे चालवत राज्याच्या कानाकोपर्‍यात शिक्षण घेणार्‍या मुलींच्या शिक्षणासाठी १३ राज्यातील ४ हजार ४०० किलोमीटरचा सायकल प्रवास करून त्यांच्या शिक्षणासाठी तब्बल ४२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार्‍या पनवेलच्या प्रिसिलीया मदन यांच्या कार्याची ज्येष्ठ समाजसेविका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दखल घेण्यात आली. ज्या वयात मौजमजा कारायची असते, त्या वयात प्रिसिलीयाने मुलींच्या शिक्षणासाठी लागणारा आर्थिक वसा घेतल्याने शिक्षण क्षेत्रात आजमितीला तिची सावित्रीची लेक म्हणून ओळख होऊ लागली आहे.

’माये ग माये, नको ग तोडू माझी शाळा
थोड्याशा बी खर्चात, नाही पाडणार तुला
गणवेश फाटलाय, पन चालंल मला.
रिबन नगं दफ्तर नगं, नगं पैसा खावूला
लई लई शिकून मोठ्ठं व्हायचंय मला !’

- Advertisement -

खऱ्या अर्थानं सावित्रीची लेक!

या ओळी वाचल्या की त्या काळी एका गरीब घरातील मुली शिकण्यासाठी किती हळव्या होत्या, याची कल्पना येऊ शकते. मुली-महिलांमध्ये शिक्षणाची ज्योत पेटवून सावित्रीबाई फुले यांनी त्यांना शिक्षणाची दारे उघडी करून दिली. सावित्रीबाईंनी त्या काळी लावलेली शिक्षणाची पणती आज किती मोठा वणवा झाली आहे, हे पाहिले म्हणजे नजर ’चकाचौंध’ होताना दिसून येते. परंतु, आजही कित्येक दुर्गम भागात अनेक मुली आणि महिला त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित आहेत. याच मुलींना शिकता यावे म्हणून पनवेल ते कन्याकुमारी असा तब्बल ४ हजार ४०० किलोमीटरचा सायकलने प्रवास करणारी २५ वर्षीय प्रिसिलीया मदन ही आजच्या काळातली सावित्रीबाईंची लेक ठरली आहे.

१९ दिवसांत १८ हजार किलोमीटर

पनवेलमधील ओल्ड पनवेल परिसरात राहणार्‍या प्रिसिलीया मदन हिला तिच्या लहानपणापासूनच नवनवीन स्वप्न पाहण्याची आवड होती. त्यातूनच तिने पनवेल ते कन्याकुमारीपर्यंत सुमारे १८ हजार किलोमीटरचा प्रवास सायकलवरून करण्याचे स्वप्न पाहिले. त्यानुसार तिने २४ डिसेंबर २०१५ साली स्वतःचाच शोध घेण्यासाठी हा १८ हजार किलोमीटर अंतराचा टप्पा सायकल चालवून पूर्ण केला. ही थक्क करणारी कामगिरी तिने तब्बल १९ दिवसांत पार पाडली. सायकलिंगसह ती गेल्या १६ वर्षांपासून भरतनाट्यम शिकते. अभ्यासात अव्वल असलेल्या प्रिसिलीयाने एमएससीपर्यंत शिक्षण घेतले आहे. पनवेल ते कन्याकुमारी या प्रवासापूर्वी तिने मनाली ते खारदुंग (लडाख) २०१२ मध्ये, पनवेल ते कोणार्क (ओडिशा) असा २ हजार किमीचा प्रवास सायकलिंगद्वारे २०१५ रोजी पूर्ण केला आहे. या सगळ्या प्रवासात तिला वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या भागातील मुलींशी मनमोकळ्या गप्पा मारता आल्या. त्यांच्या शाळेत भेट देऊन तेथील परिस्थिती जाणून घेता आली. महाराष्ट्र आणि गोवा सोडला तर इतर राज्यांमध्ये शाळेत जाणार्‍या मुलींची संख्या फारशी दिसली नाही. आर्थिक परिस्थितीमुळे मुलींना शाळेत पाठवणे आवाक्याबाहेर असल्याने तसेच घरकामासाठी मुलींना घरी ठेवणे सोयीचे असल्यामुळे तेथील मुली शाळेपासून वंचित राहतात, हे तिला दिसून आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -