ठाणे कारागृहात कैद्याचा आत्महत्याचा प्रयत्न

अत्यवस्थ कैद्याला जे.जे. रुग्णालयात हलविले

Mumbai

आठवड्यापूर्वीच ठाणे कारागृहात अपहरणाच्या गुन्ह्याखाली आणलेल्या 25 वर्षीय कैद्याने ब्रेक क्र 6 वर चढून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कैद्याला उपचारासाठी ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात सोमवारी सकाळी दाखल करण्यात आले. मात्र त्याची परिस्थिती गंभीर झाल्याने त्याला मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने कारागृहातील कैद्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

8 ते 10 दिवसापूर्वी ठाणे मध्यवर्ती कारागृहात अपहरणाचा गुन्हा दाखल असलेला आरोपी दीपक गुप्ता (25) हा आला होता. त्याला ब्रेक क्र 6 मध्ये बंदी होती. सोमवारी सकाळीच कैदी गुप्ता याने बेरेकच्या छतावर जाऊन खाली उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गुप्ता याला गंभीर इजा झाल्याने त्याला सोमवारी ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. सिव्हिल रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने अवघ्या दहा मिनिटातच त्याची रवानगी उपचारासाठी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती सिव्हिल रुग्णालयाच्या प्रशासनाने दिली. कैदी दीपक गुप्ता याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती कारागृह प्रसंगाच्या सूत्रांनी दिली. तर कारागृह प्रशासनाच्या प्राथमिक चौकशीत कैदी दीपक गुप्ता हा मानसिक रोगी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.