घरCORONA UPDATEरुग्णांची लुटालूट: २०० मीटर अंतरासाठी रुग्णवाहिकेचा दर ८ हजार रुपये

रुग्णांची लुटालूट: २०० मीटर अंतरासाठी रुग्णवाहिकेचा दर ८ हजार रुपये

Subscribe

कोविड १९ बाधीत रुग्णाला एका रुग्णालयातून केवळ २०० मीटर अंतरावर असलेल्या रुग्णलायात शिफ्ट करण्यासाठी एका खाजगी रुग्णवाहिकेच्या चालकाने रुग्णाच्या नातेवाईकांकडे चक्क ८ हजार रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार कुर्ला पश्चिम येथे नुकताच उघडकीस आला आहे.

मुंबईत कोविड १९ या साथीच्या रोगाने थैमान घातले आहे, कुर्ला परिसरात देखील मोठ्या प्रमाणात कोविड १९ चे रुग्ण आढळून येत आहे. लॉकडाऊन मुळे अगोदरच सर्व सामन्याची आर्थिक घडी बिघडलेली असताना खाजगी रुग्णालयांनी अक्षरशः लूट माजवली आहे, त्यात भर म्हणून खाजगी रुग्णवाहिका देखील या लुटीत सामील झाल्याचे अनेक प्रकरण समोर आले आहे.

- Advertisement -

असाच एक प्रकार कुर्ला पश्चिम टॅक्सीमन कॉलनीत राहणाऱ्या एका कोविड १९ बाधित रुग्णाच्या नातेवाईकाच्या बाबतीत घडला. टॅक्सीमन कॉलनीत राहणाऱ्या एका कुटुंबातील महिला सदस्याला कोविड १९ या आजाराचे लक्षणे आढळल्यामुळे तिला कुर्ला पश्चिम येथील हबीब या खासगी रुग्णालयात १ जून रोजी दाखल करण्यात आले होते. या महिलेची करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला, मात्र हबीब रुग्णालयात कोविड १९ रुग्णावर उपचाराची सुविधा नसल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णाला हबीब रुग्णालय पासून केवळ २०० मीटर अंतरावर असलेल्या फोजीया रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे तिला साधी रुग्णवाहिकेत ऑक्सिजन नसल्यामुळे नातेवाईकांनी ‘जस्ट डायल’ला फोन केला असता सकिनाका जरीमरी येथील मोबाईल केअर या खासगी रुग्णवाहिकेचा दूरध्वनी क्रमांक देण्यात आला. मोबाईल केअर या ठिकाणी रुग्णवाहिका बोलवण्यात आली, त्यानंतर रुग्णाला हबीब रुग्णालयातून फोजिया रुग्णालयात आणण्यात आले. त्या नंतर रुग्णवाहिका चालकाने रुग्णाच्या नातेवाईकांकडे २०० मीटर अंतरासाठी चक्क ८ हजार रुपयांची मागणी केली.

ही रक्कम ऐकून रुग्णाचे नातेवाईक अवाक झाले, त्यांनी याबाबत चालकाला जाब विचारातच त्याने मालकाचे नाव पुढे करून रुग्णवाहिकेचे लिखित बिल देण्यास नकार दिला. हा सर्व प्रकार तेथे जमलेल्या नागरिकांपैकी एकाने आपल्या मोबाईल कॅमेरात कैद केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून खासगी रुग्णवाहिकाची सुरू असलेली लूट समोर आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -