घरमुंबईखासगी डॉक्टर, आयएमए, रेडीओलॉजिस्ट संघटनाही करताहेत पूरग्रस्तांना मदत

खासगी डॉक्टर, आयएमए, रेडीओलॉजिस्ट संघटनाही करताहेत पूरग्रस्तांना मदत

Subscribe

राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वस्तू, औषधे आणि निधींसाठी मदत करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून खासगी डॉक्टरांच्या संघटनाही पुढे सरसावल्या आहेत.

राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वस्तू, औषधे आणि निधींसाठी मदत करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून खासगी डॉक्टरांच्या संघटनाही पुढे सरसावल्या आहेत. यात आता इंडियन मेडिकल असोसिएशन या खासगी डॉक्टरांच्या संघटनेने तसेच, रेडिओलॉजिस्ट संघटनानी पुढाकार घेतला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन संघटनेचे डॉक्टर पूरग्रस्त भागांत रुग्णसेवा देणार असल्याचे सांगण्यात आले.

आयएमएचे राज्यातील शंभर डॉक्टर्स सांगली, सातारा आणि कोल्हापूरात गेल्या चार दिवसांपासून रूग्ण सेवा करत आहेत. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या समन्वयातून आयएमएची ठाण्याची शाखा पूरग्रस्त भागांत रुग्णसेवा देत आहे. यात आरोग्यतपासणी तसेच औषधांचे वाटप केले जाईल. अन्न, वस्त्र तसेच इतर आवश्यक औषधांचा पुरवठाही केला असल्याचे आयएमच्यावतीने सांगण्यात आले.

- Advertisement -

ही टीम वेगवेगळ्या ठिकाणी विभागली गेली आहे. आयएमच्या पूरग्रस्त भागांतील बचावकार्यात सहभाग नोंदवायचा असल्यास आयएमएच्या ईमेल आयडीवर संपर्क साधा, असे आवाहनही राज्याच्या आयएमए शाखेने केले आहे. तर, इंडियन रेडिओलॉजिकल अँड इमेजिंग असोसिएशनने सांगलीतील ‘दि फेडरल बँक लिमिटेड’ या बँकेत खाते उघडून मदतनिधी जमा करण्याचे आवाहन करण्यात आले असल्याचे रेडिओलॉजी असोसिएशन सांगलीच्या डॉ. प्रसाद चिटणीस यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -