Monday, January 18, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मालाडच्या मालवणी येथे शालेय बसला भीषण आग

मालाडच्या मालवणी येथे शालेय बसला भीषण आग

Related Story

- Advertisement -

मालाड, मालवणी येथे रस्त्यालगत उभ्या रिकाम्या शालेय बसला अचानक सोमवारी दुपारच्या सुमारास आग लागली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. सुदैवाने अग्निशमन दलाने घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन आग विझविली. सध्या शाळा बंद असल्याने या शालेय बसचा वापर होत नसल्याने आग लागल्यानंतर या आगीच्या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

प्राप्त माहितीनुसार, मालाड, मालवणी, गेट क्रमांक -३ येथे रस्त्यालगत उभ्या असलेल्या शालेय मिनी बसला सोमवारी दुपारी १२.१० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या शालेय बसला आग लागली त्यावेळी तेथे जवळच एक मोठी बस उभी होती. अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी धाव घेऊन या आगीवर १० मिनिटात नियंत्रण मिळवले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

- Advertisement -

या बसमध्ये जर विद्यार्थी असते तर त्यांच्या जीवावर बेतले असते. अग्निशमन दलाकडून या बसला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविणे सुरू असताना तेथूनच रिक्षा आणि इतर वाहनांची वर्दळ सुरू होती. जर या शालेय बसची आग आणखीन पसरली असती आणि त्यात शेजारील मोठ्या बसनेही पेट घेतला असता तर मात्र ही दुर्घटना मोठी घडली असती. सुदैवाने अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांमुळे आगीवर तात्काळ नियंत्रण मिळविण्यात आले. ही आग का व कशी काय लागली, याबाबत पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी माहिती घेत आहेत.

मालाडच्या मालवणी भागात स्कूलबसला भीषण आग

मालाडच्या मालवणी भागात स्कूलबसला भीषण आग

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Monday, January 4, 2021 


- Advertisement -

हेही वाचा – मुंबईत कोरोनाचा रिव्हर्स गिअर! मृतांसोबतच कंटेनमेंट झोन, सीलबंद इमारती घटल्या!


 

- Advertisement -