चित्रपट निर्माती प्रेरणा अरोरा हिला अटक

चित्रपट निर्माती प्रेरणा अरोरा हिला आर्थिक घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. प्रेरणावर १६ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.

Mumbai
prerna_arora
चित्रपट निर्माती प्रेरणा अरोरा

चित्रपट निर्माती प्रेरणा अरोरा हिला आर्थिक घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. प्रेरणावर १६ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. प्रेरणा आणि क्रि अर्ज एंटरटेनमेंट यांच्या विरोधात चित्रपट डिस्ट्रीब्यूटर वाशु भगनानी यांनी तक्रार दाखल केली होती. याच प्रकरणात शुक्रवार, ७ डिसेंबर रोजी प्रेरणा अरोरा हिला पोलिसांनी अटक केली. वाशु भगनानी यांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले होते की, फन्ने खान चित्रपटासाठी त्यांना डिस्ट्रीब्यूटर म्हणून अपेक्षित क्रेडीट मिळाले नाही. ही बाब करारानुसार चुकीची आहे.

 आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार 

वाशु भगनानी यांनी प्रेरणा यांच्याव्यतिरीक्त प्रोतिमा अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या विरोधातही मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली आहे. वाशु भगनानी यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करत पोलीस आपल्या तक्रारीकडे गांभिर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप केला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here