घरमुंबईप्राध्यापकाची विद्यार्थींनीकडे शरीरसुखाची मागणी

प्राध्यापकाची विद्यार्थींनीकडे शरीरसुखाची मागणी

Subscribe

एका प्राध्यापकाने विद्यार्थींनीकडे शरीरसुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्राध्यपकाला अटक केली असून त्याला न्यायालयाने आठ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मुंबईच्या एका नामांकित कॉलेजच्या प्राध्यापकाला शुक्रवारी गावदेवी पोलिसांनी विनयभंगाच्या गुन्ह्यांत अटक केली आहे. दिलीपकुमार लालमणी हरिजन असे या ३५ वर्षीय प्राध्यापकाचे नाव असून त्याच्यावर एका एकोणीस वर्षांच्या कॉलेज तरुणीकडे शरीरसंबंधाची मागणी केल्याचा आरोप आहे. अटकेनंतर दिलीपकुमारला शनिवारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला न्यायालयाने ३ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तक्रारदार तरुणी ही वाळकेश्वर परिसरात राहत असून गावदेवीतील एका नामांकित कॉलेजमध्ये बीएससीचे शिक्षण घेत आहे. कॉलेज अ‍ॅडमिशनवरुन तिला जानेवारी २०१८ पासून तिला लेक्चर आणि प्रॅक्टीकलसाठी बसू दिले नव्हते. त्यामुळे तिची रसायनशास्त्र विषयाच्या लेक्चर आणि प्रॅक्टीकलसाठी गैरहजर अशी नोंद झाली होती. याबाबत तिने एका महिला प्राध्यापकाची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तिची भेट होऊ शकली नाही.

नेमकं काय आहे प्रकरण?

१८ फेब्रुवारीला ती सकाळी सात वाजता कॉलेजमध्ये आली. साडेअकरा वाजता रसायनशास्त्र विषयाचे प्राध्यापक दिलीपकुमार हरिजन यांनी क्लाससाठी तिला आणि इतर विद्यार्थ्यांना वर्गामध्ये बोलाविले. यावेळी वर्गात आठ ते दहा विद्यार्थी होते. साडेबारा वाजता क्लास संपल्यानंतर सर्व विद्यार्थी वर्गाबाहेर जात होते. यावेळी दिलीपकुमार यांनी तिला तिचे अर्धवट प्रॅक्टीकल गुरुवारी २१ फेब्रुवारीला तसेच ती उपस्थित नसताना तिला हजर असल्याची नोंद करतो, असे सांगून तिच्याकडे शरीरसंबंधाची मागणी केली होती. तिने तसं केल्यास तिला पास करतो, असेही सांगितलं होतं. या प्रकाराने तिला धक्काच बसला. ती तेथून निघून गेली. हा प्रकार तिने वरिष्ठ महिला प्राध्यायकांना सांगितला, या घटनेची त्यांनी गंभीर दखल घेत तिला एका शिपायासोबत गावदेवी पोलीस ठाण्यात पाठवलं. तिथे या तरुणीने दिलीपकुमार हरिजनविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदविला होता. त्यानंतर शुक्रवारी गावदेवी पोलिसांच्या एका विशेष पथकाने दिलीपकुमार यांना त्यांच्या गोरेगाव येथील सिद्धीविनायक सेवा सोसायटीमधील राहत्या घरातून अटक केली. याच गुन्ह्यांत त्यांना शनिवारी येथील स्थानिक न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांचा पोलीस उपनिरीक्षक रणजीत चव्हाण हे करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -