ठाण्यात १५ फेब्रुवारीपासून प्रॉपर्टी प्रदर्शन

Mumbai
Property Expo

पाचशेहून अधिक रेरा नोंदणीकृत प्रकल्प. तेवढ्याच प्रमाणात विकासक या शिवाय 10 हून अधिक बँका व होम फायनान्स कंपन्यांज्यामध्ये रिअल इस्टेटचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध होतील, असे प्रॉपर्टी प्रदर्शन ठाण्यात 15 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. क्रेडाई एमसीएचओच्या माध्यमातून ठाणे व आजूबाजूच्या परिसरात निर्माण होत असलेल्या प्रॉपर्टीबद्दल या प्रदर्शनात माहिती मिळेल. तसेच यामध्ये आर्थिक सेवा प्रदाता संस्था सहभागी होणार असून याचा जास्तीत जास्त ठाणेकरांनी फायदा घ्यावा. असे आवाहन प्रदर्शन समितीचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी केले आहे. हायलँड प्रींग्ज, कोलशेत रोड, ठाणे येथे 15 ते 18 फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण दिवस हे प्रदर्शन खुले राहील.

या वर्षीच्या प्रदर्शनामध्ये अनेक हौसिंग पर्याय उपलब्ध होणार असून वित्तीय सेवा प्रदाता कंपन्यांसोबत अनके प्रॉपर्टी विकासकांना भेटण्याची संधीही यावेळी उपलब्ध करून देण्यात आली आहे. क्रेडाईच्या माध्यमातून 1999 सालापासून हे प्रदर्शन सुरु करण्यात आले असून त्याचा लाभ अनेकांना झाला आहे. बजेट 2019ची घोषणा झाल्यानंतर त्यातील महत्त्वाचे बदल अंतर्भूत करून हे प्रदर्शनात प्रॉपर्टी खरेदी विक्री करण्यात येत असल्याचेही मेहता यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here