घरमुंबईन्यायप्रविष्ठ प्रकरणामुळे सेव्हन हिल्सची जागा ताब्यात घेण्याचा प्रस्ताव लांबणीवर

न्यायप्रविष्ठ प्रकरणामुळे सेव्हन हिल्सची जागा ताब्यात घेण्याचा प्रस्ताव लांबणीवर

Subscribe

तांत्रिक कारणांमुळे सुधार समितीने प्रस्ताव परत पाठवला. महापालिकेची बाजू मजबूत व्हावी याकरता प्रस्ताव परत पाठवण्यात आल्याचे सुधार समिती अध्यक्ष सदा परब यांनी स्पष्ट केले.

अंधेरी पश्चिम येथील मरोळमधील रुग्णालयाची जागा सेव्हन हिल्स हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिलेली जागा पुन्हा ताब्यात घेण्याचा प्रस्ताव सुधार समितीने प्रशासनानकडे परत पाठवला. सेव्हन हिल्स कंपनी आणि बँकेत सध्या सुरु असलेल्या न्यायप्रविष्ठ प्रकरणात न्यायालयाचा अवमान होवू नये तसेच महापालिकेची बाजू मजबूत व्हावी याकरता हा प्रस्ताव परत पाठवण्यात आल्याचे सुधार समिती अध्यक्ष सदा परब यांनी स्पष्ट केले. मरोळ येथील महापालिका रुग्णालयाच्या इमारतीसह भूभाग सेव्हन हिल्स हॉस्पिटल लिमिटेड आणि सोमा इंटरनॅशनल या संयुक्त भागीदारीतील कंपनीला २००४ मध्ये देण्यात आला होता. त्यानंतर २० जानेवारी २००५ मध्ये जागेचा करार करण्यात आला आणि त्यानंतर १३ डिसेंबर २०१३ मध्ये महापालिकेसोबत केलेला सामंजस्य करार करण्यात आला होता.

महापालिकेने १४०.८८ कोटी रुपये थकीत असल्याचा केला दावा 

त्यानुसार महापालिकेच्या अटी आणि शर्तीनुसार सेव्हन हिल्स रुग्णालय सुरु होते. परंतु सामंजस्य करारातील अटींचा भंग केल्याने तसेच नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याने, या रुग्णालयाच्या व्यवस्थापनाला महापालिकेने २४ जानेवारी २०१८ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र, याबाबत अ‍ॅक्सिस बँकेने हैद्राबादमधील नॅशनल कंपनी लॉ ट्ब्यिुनलमध्ये सेव्हनहिल्स हेल्थकेअर विरोधात इन्सॉल्वन्सी पेटिशन दाखल केले होते. यामध्ये महापालिकेला त्यांनी पक्षकार केले होते. यावेळी महापालिकेने सेव्हन हिल्सकडे मालमत्ता कर म्हणून ४७.९७ कोटी रुपये तर भाड्यापोटी ९२.९१ कोटी असे एकत्रित १४०.८८ कोटी रुपये थकीत असल्याचा दावा केला होता.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयात समोर केली ‘ही’ विनंती

मात्र, याप्रकरणात न्यायालयात सुरु असलेल्या प्रकरणी डॉ.बी.आर.शेट्टी यांनी महापालिकेची देयके अटी आणि शर्ती शिवाय न्यायालयात सादर केल्याप्रमाणे देण्याचे मान्य केले आहे. परंतू ही प्रक्रिया सुधार आणि महापालिकेच्या मान्यतेशिवाय पार पडण्याची विनंती त्यांनी केल्यामुळे त्यांचा प्रस्ताव प्रशासनाने फेटाळून लावत त्यांना दिलेल्या नोटीसप्रमाणे रुग्णालयाची जागा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव सुधार समितीपुढे मंजुरीला आला असता. अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी याप्रकरणात सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी यावर कोणताही निर्णय घेवू नये, जेणेकरून न्यायालयाचा अवमान होईल, अशी विनंती केली. त्यानुसार सुधार समिती अध्यक्ष सदा परब यांनी हा प्रस्ताव दप्तरी दाखल केला.

या जागेवर एम्सच्या धर्तीवर रुग्णालय बांधण्यासाठी महापालिका विचाराधीन

सेव्हन हिल्स रुग्णालयाकडून नियमांचे उल्लंघन होत आहे. सुमारे १७०० ते १८०० कोटी रुपयांची १७ एकरची जागा कोणत्याही परिस्थितीत महापालिका सोडणार नाही. ती ताब्यातच घेतली जाणार आहे आणि ती ताब्यात घेण्यासाठी महापालिकेला भविष्यात कोणत्याही अडचणी किंबहूना समस्या निर्माण होवू नये. म्हणून हा प्रस्ताव दप्तरी दाखल केला. या रुग्णालयाच्या जागेवर एम्सच्या धर्तीवर रुग्णालय बांधण्यासाठी महापालिका विचाराधीन आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांची तशी इच्छा आहे. त्यामुळे प्रशासनाच्या विनंतीनुसार हा प्रस्ताव दप्तरी दाखल केला असला तरी भविष्यात हा प्रस्ताव पुन्हा मंजुरीला आणून ती जागा ताब्यात घेतली जाईल, असे सदा परब यांनी स्पष्ट केले.

सेव्हन हिल्स रुग्णालयाचे एकूण क्षेत्रफळ : ७७,०५५ चौरस मीटर
भाडे पट्टयाचा कालावधी : ६० वर्षे
प्रकल्पाचा कालावधी : ६० महिने
महापालिकेकरता राखीव खाटा : २० टक्के
पहिल्या टप्प्यातील बांधकाम : ३०० खाटांचे रुग्णालय
दुसर्‍या टप्प्यातील बांधकाम : ५०० खाटांचे रुग्णालय
प्रकल्पाचा एकूण खर्च : १९६ कोटी रुपये
महापालिकेकडे असलेली एकूण थकबाकी : १४०.८८ कोटी रुपये
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -