२६/११ झालेल्या मुंबईतून साध्वी प्रज्ञाचा निषेध नोंदवला

२६/११च्या मुंबईत झालेल्या हल्ल्यात शहीद झालेले एटीएसचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलेल्या साध्वी प्रज्ञा यांचा मुबंइतील मौलाना आझाद विचार मंचाकडून असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जमून निषेध व्यक्त केला आहे.

Mumbai
Protest against sadhvi pragya insulting remark on karkare in mumbai
२६/११ झालेल्या मुंबईतून साध्वी प्रज्ञाचा निषेध

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी संशयीत आरोपी साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी २६/११ला मुंबईत झालेल्या हल्ल्यात शहीद झालेले एटीएसचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्याचाच निषेध करण्यासाठी बुधवारी २४ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता मरिन लाइन्स येथील शहीद स्मारकाजवळ मौलाना आझाद विचार मंचाचे अध्यक्ष आणि खासदार हुसेन दलवाई यांच्या नेतृत्वाखाली असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जमून शहीदांचा अपमान केल्याबद्दल साध्वी प्रज्ञाचा निषेध व्यक्त केला आहे.

मौलाना आझाद विचार मंचांने केला निषेध व्यक्त

शहिद हेमंत करकरे यांच्याविषयी केलेल्या अपमानास्पद विधानानंतर देशभरातून प्रतिक्रिया आल्यामुळे आणि भाजप पक्षांने त्या प्रतिक्रिया पाहून पक्षाच्या दबावात साध्वी प्रज्ञाने माफी मागितली असली तरी तिचा सगळ्यांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. या प्रकारणा संबंधी खासदार हुसेन दलवाई म्हणाले की, हा केवळ करकरे यांचा अपमान नाही आहे. तर इतर सर्व शहीद झालेल्या जवानांचाही अपमान आहे. मात्र, शहीदांचा अपमान केलेल्या प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपने लोकसभा निवजणुकीसाठी उमेदवारी दिल्यामुळे देशाच्या न्यायव्यवस्थेचा आणि घटनेचा अपमान केला आहे. तसेच हुसेन पुढे म्हणाले की, आम्ही तर नेहमीच म्हणत आलो आहोत की, दाहशतवादाला जात-धर्म नसतो. तसेच या निषेधामध्ये मौलाना आझाद विचार मंचचे युसूफ अन्सारी, सादिक खान, मधू मोहिते, नितीन आनेराव, जफर अन्सारी, दानिश परकर, शबाना शेख, पिंकी पंजाबी, सदफ शेख, दिवा काझी, ऍड नजमा फातिमा, नदीम खान, लतीफ आणि इतर कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून निषेध व्यक्त केला.