मनसेचा छट पुजेला विरोध

उत्तर भारतीयांमध्ये खळबळ

Mumbai
mns office in bmc may get close
मनसे अध्यक्ष राज ठाकरे

शिवसेना राम मंदिर उभारणीसाठी हिंदी भाषिक मतदारांमध्ये राजकीय सहानभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. पण मनसेनं मराठी मतावर आपली मोहर निर्माण करण्यासाठी मनसेन पुन्हा एकदा छट पुजेला विरोध केलाय. मनसेच्या या विरोधानें उत्तर भारतीय आणि हिंदी भाषिकामध्ये खळबळ निर्माण झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे कार्यकर्ते छट पुजेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. पण मनसेच्या आक्रमकतेचे परिणाम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राम मंदिर उभारणी करण्यात येणार्या चलो अयोध्या कार्यक्रमात निर्माण अडचणी निर्माण करू शकतो. कारण हिंदी प्रदेशात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना ठाकरे कुटुंबातील एकत्रित सदस्य म्हणूनचं बघितले जाते. त्यामुळे मनसे हें छट पुजेला विरोध ऐन उद्धव ठाकरे यांच्या चलो अयोध्या कार्यक्रमावेळी जाणीव पूर्वक केल्याचं राजकीय वर्तुळात बोल जात आहे

छटं पुजा १३ नोव्हेंबरला होणार आहे. या छट पुजेला विरोध करण्यासाठी मनसेनं ठाणे महापालिका आयुक्त आणि प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडे तक्रारार केली आहे. प्रदूषण नियंत्रण बोर्डानें छट पुजेवेळी जे निर्माल्य तलाव परिसरात तसंच टाकलं जातं. त्यां छट पुजा आयोजकावर कारवाई करावी असें आदेश दिल्याचं मनसे ठाणे जिल्ह्य अध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले आहे. त्यामुळे मनसेनं ठाणे महापालिका आयुक्तकडे मागणी केली आहे की गणेशोत्सवात निर्माल्य नेण्यास बंदी असते तशी बंदी छट पुजे दरम्यान करावी.नाहीं तर या छट पुजा आयोजकांना कृत्रिम तलाव निर्माण करुन त्यांना तिथं छट पुजा करण्यास सांगावे अशी सूचना मनसे कार्यकर्ते पुष्कर विचारे यांनी मनसेमार्फत केली आहे.

छटपुजेच्या आधीच ठाण्यात वातावरण तापल आहे. मनसे कार्यकर्त्यांनी ठाणे महापालिका आयुक्त इशारा देत मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल असे स्पष्ट केले आहे. ठाणे मनसेच्या इशार्याने राजकीय लढाईत मनसेला मराठी व्होट बँकचा पुन्हा एकदा जवळ करण्यात फायदा होईल का ? हे आगामी दिवसात पहावं लागेल.