घरताज्या घडामोडीपुण्यात पबजी खेळताना तरुणाला हृदयविकाराचा झटका

पुण्यात पबजी खेळताना तरुणाला हृदयविकाराचा झटका

Subscribe

पबजी खेळताना तरुणाला हृदयविकाराचा झटका आल्याची घटना पिंपरी - चिंचवडमध्ये घडली आहे.

पबजी हा जगप्रसिद्ध मोबाईल गेम आहे. या मोबाईल गेममध्ये पराभव झाल्यामुळे अनेकांनी आत्महत्या केल्याच्या बऱ्याच घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. याशिवाय पबजी गेममधील पराभव जिव्हारी लागल्यामुळे अनेकजण मनोरुग्ण देखील झाले आहेत. दरम्यान, एका तरुणाला पबजी खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याची दुर्दैवी घटना पुण्यात घडली आहे. हर्षल देविदास मेमाणे (२५), असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. शुक्रवारी हर्षल मेमाणे हा पबजी गेम खेळत होता. त्यावेळी अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो बेशुद्ध झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. पण आज, शनिवारी उपचारादरम्यान हर्षलचा मृत्यू झाला आहे.

नेमके काय घडले?

देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; पिंपरी-चिंचवडमधील रावेत परिसरात राहणाऱ्या हर्षला पबजी गेम खेळण्याची फार आवड होती. तसेच तो पबजी गेम खेळताना तणावात असायचा आणि त्या तणावातूनच त्याचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी हर्षल हा नेहमीप्रमाणे घरात पबजी गेम खेळत होता. अचानक त्याला झटका आला आणि तो बेशुद्ध पडला. अचानक हर्षल बेशुद्ध झाल्याने घरातल्यांनी त्याला तात्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, आज पहाटेच्या सुमारा त्याचा उपचारसुरू असताना मृत्यू झाला आहे. दरम्यान, हर्षल गेल्या काही वर्षांपासून काहीच काम करत नव्हता. तसेच तो सतत पबजी गेम खेळत होता. याचाच त्याच्यावर ताण येऊन त्याचा मृत्यू झाला असावा, असे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – शिर्डी रविवारपासून बेमुदत बंद, २५ गावांचा पाठिंबा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -