घरमुंबईहल्ल्याच्या निषेधार्थ विरार-नालासोपारा स्थानकात रेलरोको

हल्ल्याच्या निषेधार्थ विरार-नालासोपारा स्थानकात रेलरोको

Subscribe

पुलवामा दहशतवादी हल्ल्यांच्या निषेधार्थ आज सकाळी पश्चिम रेल्वे मार्गावारील नालासोपारा येथे रेलरोको करण्यात आला.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यांच्या निषेधार्थ आज, शनिवारी सकाळी ९ च्या दरम्यान पश्चिम रेल्वे मार्गावारील नालासोपारा येथे रेलरोको करण्यात आला. विरार ते वसई दरम्यान संतप्त नागरिकांनी हा रेलरोको केला. यावेळी मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते रेल्वे रुळांवर उतरले. या आंदोलनमुळे मात्र चाकरमान्यांचे हाल झाले. सकाळी चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल थांबवण्यात आल्यामुळे ऑफिस, कॉलेज, शाळेला जाणाऱ्यांचा खोळंबा झाला. हे आंदोलन स्थानिक नागरिकांनी केले असून दहशतवादी हल्ल्यांच्या निषेधार्थ आज नालासोपारा बंदची हाकही देण्यात आली आहे. आंदोलनकर्ते रेल्वे रुळवर उतरून पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी देत आहे. तर भारत माता की जय, असा जयघोषही करत आहेत.

- Advertisement -

प्रवाशांना वेठीस धरले 

ऐन गर्दीच्या वेळी रेलरोको केल्यामुळे नालासोपारा स्थानकातील प्लॅटफॉर्म, ब्रिज येथे प्रवासी मोठ्या संख्येने उभे असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. एकीकडे आंदोलनकर्त्यांची गर्दी तर दुसरीकडे हतबल झालेले प्रवासी यामुळे नालासोपारा रेल्वे स्थानकात दूरवर माणसंच माणस दिसत आहे. दरम्यान, आंदोलनामुळे पश्चिम मार्गावरील विरारला जाणारी लोकल वसईपर्यंत चालवल्या जातील, अशी उद्घोषणा दादर येथे देण्यात येत आहेत. अशा पद्धतीने नागरिकांना वेठीस धरण कितपत योग्य आहे, असा सवालही येथील प्रवाशांकडूने केला जात आहे. स्थानिक पोलीस, रेल्वे पोलीस आंदोलनकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असून अद्याप तरी आंदोलन मागे घेतलेलं नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -