घरमुंबईबदला बोललात ना? मग आता घेऊन दाखवा

बदला बोललात ना? मग आता घेऊन दाखवा

Subscribe

बदला घेण्याची भाषा करण्यांनी आता ते करून दाखवावं, असंच आजच्या सामना अग्रलेखातून मोदींना सांगण्यात आलं आहे.

पुलवामा येथील हल्ल्याचे इतके तीव्र पडसाद देशभर उमटत असताना शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून त्यावर भाष्य झालं नाही तर नवलच. नेहमीच त्याच्या खास शैलीत पाकड्यांचा बदला घ्या, असं सूचक वक्तव्य आजच्या सामना अग्रलेखातून करण्यात आलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता बदला घेण्याची भाषा प्रत्यक्षात आणावी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शिवाय राजकारण करण्याची वेळ नाही. तर जवानांच्या पाठीशी देशाने उभे राहण्याची वेळ आहे, असे आवाहनही या अग्रलेखातून करण्यात आले आहे. त्यामुळे बदला घेण्याची भाषा करण्यांनी आता ते करून दाखवावं, असंच काहीस अग्रलेखातून मोदींना सांगण्यात आलं आहे.

पाकिस्तानला ठोकून काढा!

‘एकटा’ पडलेला पाकिस्तान हिंदुस्थानात घुसून आमच्यावर भयंकर हल्ले करीत आहे. मोदी यांना आमचे हात जोडून एकच सांगणे आहे, पुढचे काही दिवस विरोधकांवरील हल्ले थांबवा आणि पाकिस्तानवरील हल्ल्यांचे पहा. बदला घेण्याची भाषा केलीच आहे, ती कृतीत उतरवून दाखवा. पाकिस्तानला ठोकून काढा! ठोकून काढा!! ही राजकारण करण्याची वेळ नाही. जवानांच्या पाठीशी देशाने उभे राहण्याची वेळ आहे.

अग्रलेखातील प्रमुख मुद्दे – 

  • कश्मीरची भूमी पुन्हा एकदा हिंदुस्थानी जवानांच्या रक्ताने भिजली आहे. कश्मीर आमचे आहे असे गेल्या सत्तर वर्षांपासून सांगितले जात आहे. त्या आमच्या कश्मीरात आमच्याच जवानांच्या हत्या का सुरू आहेत? पंडित नेहरूंपासून आज नरेंद्र मोदींपर्यंत परिस्थिती बदलण्याऐवजी बिघडतच चालली आहे.
  • हिंदुस्थानी लष्करावर आतापर्यंत झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. या सर्वात मोठय़ा हल्ल्याने राष्ट्रीय सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
  • हिंदुस्थानच्या हद्दीत घुसून लष्करी तळांवर आणि सशस्त्र फौजफाट्यांवर हल्ला करणे व आमचे अतोनात नुकसान करणे यास ‘भ्याड’ हल्ला कसे काय म्हणू शकता? आमच्या अति आणि फाजील आत्मविश्वासावर केलेला हा हल्ला आहे.
  • लोकसभा निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. संसदेचे शेवटचे सत्र संपले आहे. संपूर्ण सरकार भाषणबाजीत, आरोप-प्रत्यारोपात मश्गूल आहे. उद्याच्या निवडणुकांत कसे व कोणत्या मार्गाने जिंकून पुन्हा दिल्लीत यायचे या ‘पत्तेपिसी’त सगळेच दंग आणि गुंग असताना हा भयंकर हल्ला झाला आहे.
  • जवानांचे हौतात्म्य वाया जाणार नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा सांगितले आहे. म्हणजे ते नेमके काय व कसे करणार आहेत? पुलवामामधील जवानांच्या हत्याकांडाचा म्हणे जगभरातून निषेध केला जात आहे. प्रे. डोनाल्ड ट्रम्प यांनीही निषेधाचे अश्रू ढाळले आहेत. या निषेधबाजीतच आपण आनंद मानायचा काय?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -