घरमुंबईमुंबईतील पूरस्थिती नियंत्रणासाठी मिनी पंपिंग स्टेशन

मुंबईतील पूरस्थिती नियंत्रणासाठी मिनी पंपिंग स्टेशन

Subscribe

मुंबईतील रस्ते, पदपथ होणार अतिक्रमणमुक्त

मुंबईत अतिवृष्टीमुळे उद्भवणारी पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सखल भागात साचणारे पाणी टोकियोच्या धर्तीवर रेसकोर्स सारख्या मोकळ्या जागेत भूमिगत मोठ्या टाक्या बांधून त्यात साठविण्यात येणार आहे. नंतर त्या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करता येईल अथवा ते पाणी भरती नसताना समुद्रात सोडण्यात येईल. पुढील ३० वर्षांसाठी आराखडा बनविण्यात येत आहे, असे मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मुंबईतील विविध समस्या व विकासकामे यांबाबत आज पालिका मुख्यालयात पार पडलेल्या बैठकीतील विविध मुद्द्यांची पत्रकारांना माहिती देण्यात आली. यावेळी, अतिरिक्त आयुक्त वेला रासू यांनी गेल्या २०१२ पासून मुंबईत कधी व किती प्रमाणात पाऊस पडला व २८६ सखल भागात पावसाचे पाणी कसे व किती प्रमाणात साचते, त्यावर पालिका करीत असलेल्या उपाययोजना यांबाबतची सविस्तर माहितीचा आढावा घेण्यात आला.  तर पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, मुंबई महापालिकेने गेल्या ९ -१० महिन्यात फक्त कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर जास्तीत जास्त भर दिल्याचे सांगितले. तसेच, आता कोरोनासोबतच मुंबईतील विविध विकास कामे व योजना आणि मूलभूत सेवा आदींवर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले.यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, आयुक्त इकबाल चहल, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, बेस्ट समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे, नगरसेवक आशिष चेंबूरकर, अतिरिक्त आयुक्त काकाणी, वेलारासू,जैस्वाल, भिडे आदी मान्यवर उपस्थित होते.

रस्ते, पदपथ अतिक्रमण मुक्त करणार
मुंबईतील विकास कामे करताना दुसरीकडे रस्ते व पदपथ हे अतिक्रमण मुक्त करण्यात येतील. तसेच मुंबईत ज्या उड्डाणपुलाच्या खाली व पदपथाच्या ठिकाणी अंधार असेल तेथे प्रकाशझोत उपल्बध करण्यात येईल. रस्ते कामे करताना आवश्यक तेथे रेल्वे प्रशासनाशी संपर्क ठेवण्यात येईल. वाहतूक बेटांचे सुशिभिकरण करण्यात येईल, असे आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले., त्याचप्रमाणे,मुंबईत आतापर्यंत आवश्यक २२ हजार शौचालयांपैकी ७ हजार शौचालयांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित शौचालयांचे काम जलदगतीने मार्गी लावण्यात येतील.

- Advertisement -

ग्रीन, सौर एनर्जीवर भर देणार
मुंबईत लवकरच कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येईल आणि कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच, ग्रीन एनर्जीं आणि सौर एनर्जी यावरही भर देऊन विजेचा वापर करण्याबाबतचे धोरण अमलात आणण्यात येईल, असे मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

२४ वार्डात पालिका पुरस्कार योजना
मुंबई शहर व उपनगरे येथील रस्ते आणि पदपथ हे स्वच्छ ठेवण्यासाठी वॉर्ड निहाय स्पर्धा भरविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक वार्डात सहाय्यक अधिकारी यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे, अशी माहितीही पालक मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिली.

- Advertisement -

 


हेही वाचा – ड्राय रनच्या दुसऱ्या टप्प्यासाठी कूपर रुग्णालय सज्ज


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -