Coronavirus: मुंबईत करोनाच्या सावटाखाली ५०० पेक्षा जास्त वाहन खरेदी

गुढीपाडवा निमित्त आरटीओला लाखो रुपयांचा महसूल

Mumbai
vehicles
Coronavirus: मुंबईत करोनाच्या सावटाखाली ५०० पेक्षा जास्त वाहन खरेदी

हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक जण नवीन वाहन खरेदी करतात किंवा घेतलेल्या नव्या घरात गृहप्रवेश करतात. परंतू नागरिकांच्या आनंदावर करोना विषाणूने विरजण घातले आहे. तरी सुद्धा मंगळवारी सुमारे ५०० हून अधिक दुचाकी आणि चारचाकी, तर गुढीपाडव्याच्या दिवशी अंधेरी प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये १५ दुचाकी खरेदीची नोंदणी झाली आहे. एकिकडे करोनामुळे महाराष्ट्रातील जनतेचा सुरक्षेसाठी घरात कोंडून ठेवून वाहन नोंदणीसाठी आरटीओ कार्यलय खुले ठेवण्यात आले आहे. त्यामुळे राज्य सरकाराच्या कार्यपद्धतीवर सर्वसामान्यांमध्ये नाराजीचा सुर आहे.

भारतासह संपूर्ण जगा करोना विषाणूची दहशतीत आहे. केंद्र आणि राज्य शासनाने कलम १४४ लागू केला आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह देशात लॉक डाऊन करण्यात आले आहे. तसेच शासन, प्रशासन करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धस्तरावर कामाला लागले आहेत. खरेदी-विक्रीचे व्यवहार पुर्णपणे ठप्प झाले आहेत. नववर्षातील गुढीपाडव्याच्या या सणाला करोनाचे सावट पडले आहे. त्यामुळे अनेकांच्या आनंदावर विरजन पडले आहे. अनेकजण गुढीपाडव्याच्या निमित्ताने सोने खरेदी, वाहन खरेदी तसेच घर, जागा खरेदी करण्यासाठी इच्छूक असतात. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर केलेली खरेदी शुभ मानली जाते. मात्र गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर साधली जाणारी सर्वच नवीन कामे, खरेदी आता पुढे ढकलली गेली आहे. मात्र राज्याचे परिवहन विभागाचे काही कामे सुरू आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी आणि आदल्या दिवशी मुंबईचा ताडदेव आरटीओ, बोरिवली आरटीओ, अंधेरी आरटीओ आणि वडाळा आरटीओ या चारही प्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकी, चार चाकी अशा ५०० पेक्षा जास्त वाहनांची नोंदणी करण्यात आली आहेत.

५०० पेक्षा अधिक वाहनांची नोंदणी

परिवहन विभागाकडुन मिळालेल्या माहितीनूसार ताडदेव आरटीओत २०० वाहन, बोरिवली आरटीओत २१८ वाहन आणि अंधेरी आरटीओत फक्त १८ वाहनांची नोंदणी झाली आहे. वडाळा आरटीओची अद्यापही माहिती मिळालेली नाही आहे. मिळालेल्या माहितीनुसार तब्बल ४३३ वाहनांची नोंदणी झाली आहेत. त्यामुळे मंगळवारी आणि बुधावारी मिळून ५०० पेक्षा वाहनांची नोंदणी झाली आहे. लाखो रुपयांचे महसूल परिवहन विभागाला मिळाले आहेत.

करोनाचा फटका आरटीओ

गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला ५०० पेक्षा अधिक दुचाकी व चारचाकी वाहनांची नोंदणी झालेली आहे. त्यात ८० टक्क्यांहून अधिक वाहने ही दुचाकी आहेत. त्यामुळे प्रशासनाला वाहन नोंदणीतून लाखो रुपयांचा महसूलही मिळाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे भारत स्टेज ४ अर्थात बीएस-४ वाहनांची नोंदणी करण्याची मुदत ३१ मार्चला संपत आहे. त्यामुळे यंदा गुढीपाडव्याला मोठ्या संख्येने वाहनांची नोंदणी अपेक्षित होती. मात्र करोनामुळे हे होऊ शकले नाही. अशी माहिती आरटीओ विभाच्या सूत्रांनी दिली आहे.

फक्त वाहन नोंदणी सुरू

बुधवारी संचारबंदी जाहीर झाल्याने दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचे शोरूमही बुधवारी बंद ठेवण्यात आहेत. परिणामी, मंगळवारच्या तुलनेत बुधवारी कमी वाहन नोंदणी झाली. तुर्तास परिवहन विभागाने फक्त वाहन नोंदणी सुरू ठेवली असून शिकाऊ लायसन्स, पक्के लायसन्स, फिटनेस प्रमाणपत्र अशी इतर कामे पुढील काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here