घरमुंबईपुरुषोत्तम जाधव यांच्या मनगटावर शिवबंधन; साताऱ्यातून उमेदवारी जाहीर

पुरुषोत्तम जाधव यांच्या मनगटावर शिवबंधन; साताऱ्यातून उमेदवारी जाहीर

Subscribe

निवडणुकीच्या तोंडावर सध्या सर्वच राजकीय पक्षामध्ये आयाराम गयारामांचे प्रमाण जोरदार सुरू असून, शनिवारी भाजप नेते पुरूषोत्तम जाधव यांनी कमळ सोडून हाताच्या मनगटावर शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला याहे.

निवडणुकीच्या तोंडावर सध्या सर्वच राजकीय पक्षामध्ये आयाराम गयारामांचे प्रमाण जोरदार सुरू असून, आज, शनिवारी भाजप नेते पुरूषोत्तम जाधव यांनी कमळ सोडून हाताच्या मनगटावर शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला याहे. मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. वेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते, पशुसंवर्धन मंत्री अर्जुनराव खोतकर, शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर, उपनेते व संपर्क प्रमुख नितीन बानुगडे-पाटील आदि नेते उपस्थित होते. दरम्यान, साताऱ्याची जागा शिवसेनेला जाणार असल्याने उदयन राज यांच्या विरोधात जाधव यांना उमेदवारी मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.

उदयनराजो भोसले यांच्या विरोधात 

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये साताऱ्याची जागा रिपाई पक्षाला दिल्याने पुरुषोत्तम जाधव यांनी शिवसेनेला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला होता. मात्र आता त्यांनी पुन्हा घरवापसी केल्यामुळे साताऱ्यामध्ये शिवसेना विरुद्ध उदयन राजे भोसले, असा सामना पहायला मिळणार आहे. दरम्यान, माध्यमांशी  बोलतान जाधव यांनी, मी आज माझ्या घरात पुन्हा आलेलो आहे. आज मी अधिकृतरित्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे. माझी नाराजी दूर झालेली असून आता सातारा मतदारसंघात भगवा फडकला जाईल, असा विश्वास व्यक्त केला.

- Advertisement -

हेही वाचा –

जम्मू काश्मीरमध्ये भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, ३ जण जखमी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -