Monday, August 10, 2020
Mumbai
28 C
घर महामुंबई ईव्हीएम मशीनच्या सुरक्षितेतवर प्रश्नचिन्ह

ईव्हीएम मशीनच्या सुरक्षितेतवर प्रश्नचिन्ह

- मनसे आक्रमक निवडणूक आयोगाकडे धाव,- न्यायालयात जाण्याचा दिला इशारा

Mumbai
EVM machine
ईव्हीएम मशीन

मुंबईसह राज्यात सोमवारी विधानसभा निवडणुक सुरळीत पार पडली असली तरी अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडण्यासंदर्भात तक्रारींनी डोके वर काढले. त्यानंतर आता ईव्हीएम मशीन्स नव्या एका वादात अडकल्या असून सोमवारी रात्री अनेक निवडणूक केंद्रावरुन लॉकर रुमपर्यंत नेण्याचा प्रवास असुरक्षितपणे केला गेल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही पोलीस बंदोबस्ता शिवाय हा प्रवास केल्याने मनसेने याप्रकरणी थेट निवडणूक आयोगाकडे धाव घेतली असून लवकरात लवकर याप्रकरणी खुलासा करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात योग्य स्पष्टीकरण न मिळाल्यास याप्रकरणी न्यायालयात जाण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.

मुंबईसह राज्यात सोमवारी विधानसभा निवडणूक सुरळीत पार पडली. या निवडणुकीत अनेकांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवर ताशेेरे ओढत तब्बल २०० हून अधिक तक्रारी देखील केल्या. त्यानंतर आता ईव्हीएमचा लॉकर रुमपर्यंतचा प्रवास वादाच्या भोवर्‍यात अडकल्याची तक्रारी विलेपार्ले येथून करण्यात आली आहे. नियमानुसार निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या त्या बूथवरील निवडणूक अधिकार्‍यांनी त्यांच्या केंद्रावरील ईव्हीएम मशीन्स या विशेष पोलीस बंदोबस्तात आणि त्यासाठी गाड्यांची देखील व्यवस्था करण्यात येते.

मात्र विलेपार्ले येथील काही केंद्रावरुन निवडणूक अधिकार्‍यांनी त्या मशीन्स कोणत्याही पोलीस बंदोबस्ताशिवाय लॉकर रुमपर्यंत ठेवल्या आहेत, अशी तक्रार विलेपार्ले येथील मनसेच्या अधिकृत उमेदवार जुईली शेंडे यांनी केली आहे. यासंदर्भात शेंडे यांनी मुख्य निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे तक्रार केली असून त्यांना एक निवेदन देत यासंदर्भातील तक्रार केली आहे.

या निवेदनानुसार विलेपार्ले विधानसभेत वापरण्यात आलेल्या ईव्हीएम, व्हीव्हीपॅट आणि इतर निवडणूक संबंधित साहित्याची असुरक्षितेतेची ने आण करण्यात आली असे दिसून आले आहे. हे साहित्य ने आण करताना कर्मचार्‍यांनी हनुमान रोड लगतच्या भुयारी मार्गातून प्रवास देखील केला असून हा प्रवास करताना काही तरी चुकीची घडलेले असल्याची दाट शक्यता यावेळी वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली असून मतमोजणीपूर्वी याचा अहवाल न दिल्यास आम्ही याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करु असा इशारा जुईली शेंडे यांनी दिला आहे.