घरताज्या घडामोडीऑनलाईन बैठकीत १०० कॉलेजच्या तुकडी अभ्यासक्रमांना घाईघाईत मान्यता!

ऑनलाईन बैठकीत १०० कॉलेजच्या तुकडी अभ्यासक्रमांना घाईघाईत मान्यता!

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाची व्यवस्थापन परिषदेची बैठक ३१ मार्चला ऑनलाइन घेण्यात आली. मात्र नवीन तुकडी आणि अभ्याक्रमांचे प्रस्ताव विद्यापीठाकडून ऐनवेळी परिषदेसमोर मांडून तब्बल १०० कॉलेजांच्या प्रस्तावांवर घाईघाईत चर्चा घडवून आणली. हे प्रस्ताव उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहेत.

दरवर्षी विद्यापीठ नवीन कॉलेज, तुकडीवाढ, नवीन अभ्यासक्रमाचे प्रस्ताव शिक्षण संस्थांकडून मागवत असते. यंदा विद्यापीठाकडे विविध १५९ कॉलेजनी प्रस्ताव सादर केले होते. हे प्रस्ताव मंगळवारी ऑनलाईन घेण्यात आलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आले. परंतु व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांना हे प्रस्ताव विद्यापीठाकडून उशिरा दिल्याने त्यांची छाननी करणे शक्य झाले नाही. त्यामुळे सदस्यांनी त्याबात बैठकीत नाराजी व्यक्त केली. तसेच हे प्रस्ताव छाननी समिती, स्थानिक चौकशी समितीने केलेल्या पाहणीच्या आधारे बनवण्यात आले असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले असले तरी स्थानिक चौकशी समितीमध्ये विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी नसल्याबद्दल सदस्यांनी प्रतावाबाबात शंका उपस्थित केली. अधिकृत विद्यार्थी प्रतिनिधी नसल्याने मान्यतेसाठी प्रस्ताव आलेल्या कॉलेजांमध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून आवश्यक सुविधा असण्याबाबत शंका उपस्थित करण्यात आली. परंतु सध्या कोरोनाची समस्या वाढत असल्याने आणि प्रस्ताव उशिरा गेल्यास चांगल्या कॉलेजचे नुकसान होण्याची शक्यता होती. त्यामुळे परिषदेच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठाने घाईघाईत सादर केलेल्या प्रस्तावांना मान्यता दिल्याचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले.

- Advertisement -

व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजूर केलेले १०० प्रस्तावांना राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे पाठवण्यासही सदस्यांनी मंजुरी दिल्याचेही सावंत यांनी सांगितले.

सुरक्षारक्षकांना १० हजारांचा भत्ता

कोरोनामुळे उद्धभवलेल्या परिस्थितीत अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सुरक्षारक्षकांना १० हजार प्रोत्साहन भत्ता देण्यासही मंजुरी देण्यात आली. तसेच या कर्मचाऱ्यांना विम्याचे सरंक्षण देण्याच्या प्रस्तावावरही सकारात्मक चर्चा करण्यात आली.

- Advertisement -

कलिनातील कर्मचाऱ्यांना रक्तदान करण्याचे आवाहन

मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात काही कर्मचारी कार्यरत आहेत. तर अनेकजण तेथील क्वाटर्समध्ये राहत आहे. या कर्मचाऱ्यांनी कोरोनाचा पार्श्वभूमीवर सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून राबवण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही विद्यापीठाकडून करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -