निवडणूक निकालाचे ‘कॉमेडी’ साईड इफेक्ट्स

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वच राजकीय पक्ष सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. या ट्रोलींग ट्रेंडमध्येही राज ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यावर नेटीझन्सने जास्त टीका केली.

mumbai
Memes On election
निवडणुकीनंतर राहुुल गांधी ट्रोल

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि भाजपाचं कमळ फूललं. भाजपा आणि शिवसेना युतीच्या जल्लोषाचं एकीकडे वातावरण असताना दुसरीकडे जवळपास सर्वच बड्या पक्षांवरुन सोशल मीडियावर जोक्स व्हायरल व्हायला सुरूवात झाली. बुधवारी सकाळ पासून ते अगदी निकालाच्या शेवटच्या टप्प्यांपर्यंत सर्वांची नजर सोशल मीडियावर होती. निकालादरम्यान काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. शिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, प्रियांका गांधी, राज ठाकरे या सर्वच नेत्यांवरुन जोक्स व्हायरल झाले.

 

 

सोशल मीडियावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. राज ठाकरे यांनी मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधात राज्य भरात प्रचार सभा घेऊन भाजपाची पोलखोल केली होती. पण, तरी देखील या प्रचार सभांचा फार काही परिणाम मतांवर झालेला दिसला नाही. त्यामुळे आता नेटीझन्सनी राज ठाकरेंवरही निशाणा साधला आहे.

 

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here