घरमुंबईWHO नं केलं धारावीचं कौतुक, राहुल गांधी म्हणतात...

WHO नं केलं धारावीचं कौतुक, राहुल गांधी म्हणतात…

Subscribe

' या यशाबद्दल धारावीतील लोकं विशेष कौतुकास पात्र आहेत.'

कोरोना महामारी संबंधित असलेल्या ‘धारावी मॉडेल’ चे कौतुक केल्याबद्दल कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी जागतिक आरोग्य संघटनेचे कौतुक केले आहे. त्यांनी असे म्हटले की, या यशाबद्दल धारावीतील लोकं विशेष कौतुकास पात्र आहेत.

- Advertisement -

राहुल गांधी यांनी असे ट्विट केले की, ‘कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आपल्या देशातील धारावी मॉडेलचे डब्ल्यूएचओने कौतुक केले आहे. धारावीच्या या कर्तृत्वाला जबाबदार असणारी संपूर्ण टीम आणि धारावीतील लोकं विशेषत: या कौतुकास पात्र आहेत.’

डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस एडहानोम गेब्रेयेसुस यांनी शुक्रवारी जिनिव्हा येथे एका डिजिटल पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले की, कोरोना विषाणूचा प्रसार आटोक्यात आणला जाऊ शकतो हे दाखवणारी जगभरातील अनेक उदाहरणे आहेत. ते म्हणाले होते, “इटली, स्पेन आणि दक्षिण कोरिया आणि मेगासिटी मुंबईची घनदाट वस्ती असलेली धारावी ही काही उदाहरणे आहेत.”

- Advertisement -

WHO ने केली ‘धारावी मॉडेल’ची स्तुती

दिवसेंदिवस कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून कोरोनाशी सामना करण्याचे सर्वतोपरी प्रयत्नही सुरू आहेत. मात्र यात दिलासादायक बाब म्हणजे धारावीत नियंत्रणात आलेली कोरोनाबाधितांची संख्या. मुंबईतील धारावी मॉडेलची जागतिक आरोग्य संघटनेनंही दखल घेतली आहे. त्यांनी धारावी मॉडेलची स्तुती केली आहे.

धारावीतील झोपडपट्टी आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी मानली जाते. या भागात जवळपास ६.५ लाख लोकं राहतात. मात्र धारावीत राबवलेल्या मॉडेलची जागतिक आरोग्य संघटनेनं दखल घेतली आहे. WHO चे प्रमुख टेड्रोस एडहानोम गेब्रेयेसुस यांनी मुंबईतील या ‘धारावी मॉडेल’ची स्तुती केली आहे


WHO ने केलं धारावी मॉडेलचं कौतुक, यामुळे कोरोना व्हायरस येऊ शकतो नियंत्रणात!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -