घरमुंबईनालासोपारा अपडेट : रेलरोको मागे पण आंदोलन सुरुच

नालासोपारा अपडेट : रेलरोको मागे पण आंदोलन सुरुच

Subscribe

नालासोपारा स्थानकात करण्यात आलेला रेलरोको अखेर मागे घेण्यात आला आहे. असे असले तरीही जागोजागी दिलेली बंदची हाक कायम असून आंदोलन नालासोपरा ते विरार दरम्याना गटागटामध्ये विखरले असून त्यांनी आंदोलन सुरु ठेवले आहे.

नालासोपारा स्थानकात करण्यात आलेला रेलरोको अखेर मागे घेण्यात आला आहे. सकाळपासून सुरु झालेल्या रेलरोको दरम्यान पोलिसांकडून लाठीचार्जही करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात स्थानकांवर तसेच रेल्वे रुळावर गर्दी करत पाकिस्तानविरोधी घोषणा दिल्या. मात्र पोलीस अधिकाऱ्यांच्या आवाहनानंतर दुपारच्य दरम्यान आंदोलकांनी रेल्वेचा मार्ग लोकलसाठी मोकळा करून दिला. असे असले तरीही जागोजागी दिलेली बंदची हाक कायम असून आंदोलन नालासोपरा ते विरार दरम्याना गटागटामध्ये विखरले असून त्यांनी आंदोलन सुरु ठेवले आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवण्यासाठी हे आंदोलन तीव्र करण्यात आले होते. परंतू याचा फटका लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना झाला असून प्रवासी स्थानकातच खोळंबले. आंदोलनामुळे पश्चिम रेल्वे विस्कळीत झाली होती. मात्र आता ही रेल्वे वाहतूक पूर्व पदावर आली आहे.

- Advertisement -

ज्या प्रकारे आंदोलन करण्यात येत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे. कोणत्याही व्यक्तीने कायदा हातामध्ये घेऊ नये. आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे.
– विजयकांत सागर, अप्पर पोलीस आयुक्त, नालासोपारा

आंदोलनकांवर लाठीचार्ज

नालासोपारा स्थानकातील रेलरोको आंदोलन चिघळले असून नाईलाजास्तव गर्दीला पांगवण्यासाठी स्थानिक पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आहे. आक्रमक आंदोलनकर्ते, प्रवासी यांची पोलिसांसोबत बाचाबाची झालू असून आधी त्यांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. तसेच बाटल्याही फेकण्यात आल्या. या दगडफेकी एक पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्याला दगड लागल्याने ते जखमी झाले असून त्यांना नजीकच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. अखेर पोलिसांनी संतप्त जमावावर बचावासाठी लाठीचार्ज केला.

- Advertisement -

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध 

पुलवामा दहशतवादी हल्ल्यांच्या निषेधार्थ आज सकाळी ९ च्या दरम्यान पश्चिम रेल्वे मार्गावारील नालासोपारा येथे रेलरोको करण्यात आला होता. विरार ते वसई दरम्यान संतप्त नागरिकांनी हा रेलरोको केला. यावेळी मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते रेल्वे रुळांवर उतरले. या आंदोलनमुळे मात्र चाकरमान्यांचे हाल झाले. सकाळी चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल थांबवण्यात आल्यामुळे ऑफिस, कॉलेज, शाळेला जाणाऱ्यांचा खोळंबा झाला. हे आंदोलन स्थानिक नागरिकांनी केले असून दहशतवादी हल्ल्यांच्या निषेधार्थ आज नालासोपारा बंदची हाक दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -