घरमुंबईइस्रोच्या मदतीने रेल्वे सांगणार ‘रिअल टाईम’

इस्रोच्या मदतीने रेल्वे सांगणार ‘रिअल टाईम’

Subscribe

अचूक वेळ सांगण्यासाठी आरटीआयएस प्रणाली अंमलात

पावसाळ्यात रेल्वे वेळापत्रकावर कोलमडून पडणे हे नवीन नाही. त्यामुळे प्रवाशांना त्रास तर होतोच,त्याच बरोबर रेल्वे गाड्यांच्या नियोजनात अडथळ निर्माण होतो. मात्र आता रेल्वेकडून इस्रोच्या मदतीने ‘रिअल टाइम ट्रेन इन्फॉर्मेशन सिस्टीम’चा (आरटीआयएस) हे डिव्हाईस विकसित करण्यात आले आहे. मध्य रेल्वेने आतापर्यंत ७०२ लोकोमोटिव इंजिनांपैकी १३8 इंजिनला हे डिव्हाईस जोडले असून आता सर्व इंजिनांमध्ये हे डिव्हाईस लावण्यात येणार आहे.

भारतीय रेल्वेच्या रेल्वे गाड्या अवेळी धावत असल्याच्या तक्रारी रेल्वे प्रवाशांकडून केल्या जातात. विशेष, म्हणजे यांच्या सर्वाधिक तक्रारी पावसाळ्यात येतात. त्यामुळे मध्य रेल्वेने आता ‘रिअल टाइम ट्रेन इन्फॉर्मेशन सिस्टीम’चा (आरटीआयएस) हे डिव्हाईस सर्व रेल्वेच्या इंजिनला लावण्याचा निर्णय घेता आहे. आतापर्यंत मध्य रेल्वेच्या पाच विभागांतील एकूण 138 लोकोमोटिव इंजिनला जोडण्यात आले आहे. त्यामुळे उपग्रहांच्या माध्यमातून गाड्यांचे सर्वप्रकारचे अपडेट आता रेल्वेला मिळण्यास मोठ्या प्रमाणात मदत होत आहे. या नव्या प्रणालीमुळे रेल्वे गाडीच्या येण्याची, जाण्याची वेळ, गाडीचा नेमका ठावठिकाणा समजण्यास मदत होणार आहे.सोबतच मध्य रेल्वेला आपल्या नेटवर्कमध्ये धावणार्‍या गाड्यांच्या संचलनात गती प्राप्त होईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली आहे.

- Advertisement -

रेल्वे आधुनिकतेकडे
रेल्वेला जीपीएस स्टीम लावली आहे. तरी सुध्दा रेल्वेच्या लोकेशनमध्ये तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळे रेल्वेने इस्रोची मदत घेेतली आहेत. ‘इस्रो’द्वारा विकसित करण्यात आलेल्या या ‘आरटीआयएस’ उपकरणाला ‘गगन जिओ पोझिशनिंग सिस्टीम’च्या मदतीने जोडण्यात आले आहे. त्यामुळे धावणार्‍या गाड्या आणि त्यांचे ठिकाण यांची खात्रीशीर माहिती मिळवणे शक्य झाले आहेत.

‘आरटीआयएस’ प्रणालीचे डिव्हाईस मध्य रेल्वेच्या 702 लोकोमोटिव्स इंजिनांपैकी 138 रेल्वे इंजिनला लावण्यात आले आहेत.या नव्या प्रणालीमुळे रेल्वे गाड्यांचे सर्वप्रकारचे अपडेट आता रेल्वेला आणि प्रवाशांना मिळण्यास मदत होत आहे. – सुनिल उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -