घरमुंबईवांद्रे पूर्वेचा रेल्वेचा ब्रिज अखेर खुला

वांद्रे पूर्वेचा रेल्वेचा ब्रिज अखेर खुला

Subscribe

वांद्रे पूर्व स्थानकापासून वांद्रे कुर्ला संकुलाला जोडणार्‍या स्कायवॉकला बंद होऊन आता वर्ष होईल. पण अद्यापही स्कायवॉक नागरिकांना खुला करून देण्यात आलेला नाही. रेल्वेचा स्कायवॉकला जोडणारा एक ब्रिज मात्र वांद्रे पूर्वेला प्रवाशांसाठी खुला झाला आहे. त्यामुळेच सध्याच्या एका रेल्वे ब्रिजवर ऐन गर्दीच्या वेळेत येणारा मोठा ताण कमी होण्यासाठी मदत होणार आहे.

वांद्रे स्कायवॉक हा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या फ्लायओव्हरच्या कामासाठी गेल्या वर्षी मार्च महिन्यात बंद करण्यात आला होता. पण सप्टेंबरमध्ये स्कायवॉक खुला होईल, असे आश्वासन एमएमआरडीएकडून देण्यात आले होते. दरम्यानच्या कालावधीत स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडिटचे काम मुंबई महापालिकेने हाती घेतले.

- Advertisement -

या स्कायवॉकच्या ऑडिटनंतर एक अपघात झाला. त्यामुळे महापालिकेने हा स्कायवॉक बंद करण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे एमएमआरडीएकडून स्कायवॉकशी संबंधित असलेले काम पूर्ण झालेले नाही. स्कायवॉकच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या बाजूचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे स्कायवॉक बंद आहे.

पादचार्‍यांची भर रस्त्यातून पायपीट

- Advertisement -

वांद्रे कुर्ला संकुल, जिल्हाधिकारी कार्यालय, म्हाडा, एमएमआरडीए ऑफिस, फॅमिली कोर्ट याठिकाणी दैनंदिन कामासाठी मोठ्या प्रमाणात लोक येतात. तसेच याठिकाणी काम करणारे कर्मचारी आणि अधिकारी वर्गाला सायंकाळच्या तसेच सकाळच्या कार्यालयीन वेळात रस्त्यावरून चालायची वेळ येते. अनेकदा फुटपाथवर जागा नसल्यानेच रस्त्याची एक लेन व्यापून लोक स्टेशनच्या दिशेने धावत असतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -