घरमुंबईरेल्वे प्रवाशाकडे सापडले १७ किलो सोन्याचे घबाड

रेल्वे प्रवाशाकडे सापडले १७ किलो सोन्याचे घबाड

Subscribe

मुंबईहून अहमदाबादकडे निघालेल्या एका रेल्वे प्रवाशाकडे तब्बल १७ किलो वजनाचे सोन्याचे घबाड सापडले आहे. याप्रकरणी प्रवाशाला ताब्यात घेतले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

एका रेल्वे प्रवाशाकडे सोन्याचे घबाड आढळून आले आहे. या घबाडात तब्बल १७ किलो वजनाचे सोने आढळून आले असून याची बाजारभावाप्रमाणे ५ कोटी १० लाख रुपये इतकी किंमत आहे. हा प्रवासी मुंबईहून अहमदाबादकडे निघाला होता. त्यावेळी या ट्रेनमध्ये चढलेल्या टीसीला प्रवाशाची हालचाल संशयास्पद वाटली आणि त्याची तपसणी केल्यानंतर या प्रवाशाच्याकडे सोन्याचे घबाड आढळून आले. मनीष असे या प्रवासाचे नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नेमके काय घडले?

सुर्यनगरी एक्स्प्रेसमध्ये मनीष या नावाचा प्रवासी बोरिवली या ठिकाणी चढला. त्याने S9 या कोचमध्ये आपली बॅग ठेवून बसला. हा प्रवासी मुंबईहून सुरतला निघाला होता. त्याच दरम्यान टीसी तिकीट तपासण्यासाठी ट्रेनमध्ये चढले. तिकीट तपासणी सुरु असताना टीसीचे लक्ष मनीषकडे गेले. त्यांना मनीष या प्रवाशाची हालचाल संशयास्पद वाटली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांनी रेल्वे प्रवासी मनीषला ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असता, पोलिसांसह इतर प्रवाशांना धक्काच बसला. कारण या प्रवाशाच्या बॅगेमधून तब्बल १७ किलो वजनाचे सोने आढळून आले. मनीष एका कुरिअर कंपनीचा कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

५ कोटी १० लाख रुपयाचे दागिने

रेल्वे प्रवाशाची याबाबत चौकशी केली असता हे पार्सल सुरतला पोहोचवण्यास सांगितल असल्याचे मनीषने सांगितले. विशेष म्हणजे मनीषला देखील आपल्या बॅगमध्ये इतकं सोन आहे याची कल्पना नसल्याचे तो सांगतो. पोलिसांनी सोन जप्त करुन या सोन्याची किंमत काढली असता हे सोन ५ कोटी १० लाख रुपयाचे असल्याचे समोर आले आहे. रेल्वे पोलिसांनी मनीषला ताब्यात घेतले असून हे पार्सल कोणी दिले? कोणकडून आले? हे सोनं कोणाकडे पाठवण्यात येणार होते? याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -