घरCORONA UPDATECorona: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, रेल्वे पोलिसालाच कोरोनाची लागण!

Corona: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, रेल्वे पोलिसालाच कोरोनाची लागण!

Subscribe

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसटीवर १० मार्चपासून ड्युटीवर असलेल्या एका पोलिस हवालदाराला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

सरकार आणि प्रशासनाकडून वारंवार विनंती करून देखील लोकं घरात थांबायला तयार नसल्याचं पाहून शेवटी कोरोनाचा धोका टाळण्यासाठी हाती दंडुका घेऊन उतरले ते पोलीस! मग ते मुंबई पोलीस असो, रेल्वेचे पोलीस असो किंवा इतर सुरक्षा कर्मचारी! पण दुर्दैवाने टीकाकारांना पोलिसांच्या हातातला दंडुका दिसला, पण त्यांनी प्रत्यक्ष कोरोनाच्या धोक्यात घातलेला त्यांचा जीव मात्र दिसला नाही. रस्त्यावर उतरून बाहेर फिरणाऱ्यांना कधी विनवणी करून तर कधी दंडुक्याचा प्रसाद देऊन सक्तीने घरी जायला सांगणाऱ्या पोलिसांना डॉक्टरांप्रमाणेच कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. आणि मुंबईत सापडलेल्या एका कोरोना पॉझिटिव्ह पोलिसामुळे हेच सिद्ध होतंय. पोलिसांना देखील याची लागण झाली ही धोक्याची घंटाच म्हणावी लागेल.

संपर्कात आलेले इतर १५ पोलीसही क्वॉरंटाईन!

कल्याणच्या खडकपाडा भागात राहणारे हे रेल्वे पोलीस हवालदार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनवर १० मार्चपासून ड्युटीवर होते. ३० मार्च रोजी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे आता त्यांच्या संपर्कात आलेल्या एकूण १५ पोलीस कर्मचाऱ्यांना क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे. त्यांची देखील कोरोनाची चाचणी घेण्यात येणार आहे. शिवाय, कल्याण येथे त्यांच्या संपर्कात आलेल्या दोघांना देखील क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे.

- Advertisement -

पोलिसांनाच लागण झाली, तर सुरक्षा कोण देणार?

हातात दंडुका घेऊन फिरणाऱ्या पोलिसांवर मोठी टीका केली गेली. पण बाहेर फिरणाऱ्या संभाव्य कोरोनाग्रस्तांच्या क्लोज कॉन्टॅक्ट अर्थात सगळ्यात जवळ जाणारे पोलीसच आहेत. फिरणाऱ्या लोकांना पोलिसांचा स्पर्श होतो, त्यांच्या अगदी १ फुटांपेक्षाही जवळ पोलिसांना प्रसंगी जावं लागतं. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण होण्याची दाट शक्यता असते. पण सगळ्यात गंभीर बाब म्हणजे, पोलिसांना कोरोनाची लागण झाली, तर पुन्हा त्यांच्या संपर्कात येणारे इतर पोलीस आणि त्यांच्या संपर्कात येणारे इतर सामान्य नागरिक, असा हा कोरोनाचा फैलाव सहज होऊ शकतो. महत्त्वाचं म्हणजे, रस्त्यांवर सुरक्षेसाठी तैनात असणारे पोलीसच जर कोरोनामुळे क्वॉरंटाईन झाले, तर सुरक्षाव्यवस्था कुणाच्या भरवशावर सोडायची? हा देखील एक प्रश्नच आहे.


हेही वाचा: सावधान! एप्रिल फुल करणे पडणार महागात
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -