घरमुंबईभिरकावलेल्या दगडाने रेल्वे सुरक्षा दलाचा जवान जखमी

भिरकावलेल्या दगडाने रेल्वे सुरक्षा दलाचा जवान जखमी

Subscribe

धावत्या ट्रेनवर अज्ञात व्यक्तीने भिरकावलेला दगड लागून रेल्वे सुरक्षा दलाचा जवान जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी कांजूरमार्ग विक्रोळीच्या रेल्वे स्थानकांदरम्यान घडली. अजयकुमार बलवीर सिंह (२६) असे जखमी रेल्वे सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. जखमी झालेल्या जवानाला उपचारासाठी भायखळा रेल्वे रुग्णालयात दाखल कऱण्यात आला आहे.

सुदैवाने या जवानाचा डोळा थोडक्यात बचावला असून कुर्ला रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध रेल्वे कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती वपोनि. इनामदार यांनी दिली. २४ तासांपूर्वीच अशीच एक घटना कुर्ला आणि घाटकोरच्या दरम्यान घडली होती. मात्र या घटनेत कोणीही जखमी नसून वारंवार होणार्‍या या घटनांमुळे रेल्वे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

- Advertisement -

रेल्वे सुरक्षा दलाच्या ठाणे कार्यालयात अजयकुमार कॉन्स्टेबल या पदावर कर्यरत आहे. कल्याण येथे राहणारा अजयकुमारने मुंबई सीएसटीएम येथे येण्यासाठी शनिवारी सकाळी कल्याण येथून ८ वाजून २७ मिनिटाची बदलापूर सीएसटीएम ट्रेन पकडली होती. अपंगांच्या डब्यातून दारात उभा राहून तो प्रवास करीत होता.

साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ट्रेनने कांजूरमार्ग स्थानक सोडले असता उड्डाणपुलावरून अज्ञात व्यक्तीने ट्रेनच्या दिशेने भिरकावेलेला दगड ट्रेनच्या दारात उभ्या असलेल्या अजयकुमार याच्या डोळ्याजवळ लागून तेथून रक्तस्त्राव सुरू झाला. त्यानंतर सहप्रवाशांनी अजय कुमारला दारातून आत ओढले. घाटकोपर रेल्वे स्थानक येताच प्रवाशांनी जखमी अजयकुमारला रेल्वे पोलिसांकडे सोपवले. रेल्वे पोलिसांनी त्याला ताबडतोब राजावाडी रुग्णालयात आणून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी भायखळा येथील रेल्वे रुग्णालयात पाठविले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -