घरमुंबईमुंबईतील 'या' रेल्वे स्थानकांचे बदलणार रुप

मुंबईतील ‘या’ रेल्वे स्थानकांचे बदलणार रुप

Subscribe

या रेल्वे स्थानकांसोबत मुंबईतील १६ रेल्वे स्थानकांचा येत्या पाच वर्षात कायापालट करण्यात येणार आहे.

मुंबईमध्ये लोकल ट्रेनने प्रवास करताना सामान्य मुंबईकरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. रेल्वे स्थानकावरून जात असताना अनेक ठिकाणी पानांच्या, तंबाखूच्या पिचकऱ्यांनी रंगलेले कोपरे, किळसवाणी वाटणारी अस्वच्छता, जीव मुठीत घेऊन चालायला लावणारे पुल अशा अनेक सोयी सुविधांचा अभाव असणाऱ्या मुंबईतील काही स्थानकांचा चेहरा मोहरा बदलणार आहे.

- Advertisement -

या रेल्वे स्थानकांमध्ये कांदिवली, मीरारोड आणि गुरू तेग बहादूर नगर या रेल्वे स्थानकांमध्ये लवकरच खाण्याचे स्टॉल्स, ओपन एअर रेस्टॉरन्ट आणि इतर सुविधा दिल्या जाणार आहे. या रेल्वे स्थानकांसोबत मुंबईतील १६ रेल्वे स्थानकांचा येत्या पाच वर्षात कायापालट करण्यात येणार आहे.

रेल्वे विकास महामंडळाने तयार केलेल्या योजनेनुसार, मुंबईतील रेल्वे स्थानकांचे स्वरूप बदलावे याकरिता पश्चिम रेल्वेच्या कांदिवली आणि मीरारोड, तर हार्बर मार्गावरील गुरू तेग बहादूर नगर स्थानकाच्या विकासाचे काम लवकरात लवकर हाती घेण्यात येणार आहे. तसेच आगामी पाच वर्षात या तीन स्थानकांच्या विकासाचे काम पुर्ण करण्याचे महामंडळाने निश्चित केले आहे.

- Advertisement -

अशा स्वरूपात दिसणार रेल्वे स्थानकं!

मीरारोड

  • दुमजली इमारत होणार
  • फलाट क्रमांक एकच्या वर डेक तयार करणार
  • ओपन एअर गार्डन संकल्पनेवर आधारित रेस्टॉरंट सुरू करणार

कांदिवली

  • स्थानकाची इमारत तीन मजली होणार
  • विमानतळाच्या धर्तीवर पिकअप आणि ड्रॉप पॉइंट्स विकसित करणार
  • खाण्यापिण्यासाठी फूड कोर्ट, बुक शॉप आणि मेडिकल स्टोअर सुरू होणार
  • स्थानकात स्वयंचलित जिने आणि १० मीटर रुंदीटचे ओव्हरब्रिज उभारणार

गुरू तेग बहादूर नगर

  • जीटीबी स्थानक दोन मजल्याचे होणार
  • फलाट क्रमांक एकच्या वर डेक उभारणार
  • ओपन एअर गार्डन संकल्पनेवर आधारित रेस्टॉरंट सुरू होणार
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -