घरमुंबईराज-आदित्य ठाकरेंनी थकवला दंड

राज-आदित्य ठाकरेंनी थकवला दंड

Subscribe

वाहतुकीचे नियम मोडूनही काही सेलिब्रिटींनी दंड थकवल्याचे समोर आले आहे. सिग्नल तोडणे, नो एन्ट्रीमध्ये वाहन नेणे, झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे करणे यासाठी वाहतूक पोलिसांकडून दंड आकारला जातो.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना अनेकदा वाहतूक पोलीस दंड थोटावत असल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे.  पण वाहतुकीचे नियम मोडूनही जर राजकीय नेते आणि सेलिब्रेटींनी दंड भरला नाही असे आम्ही जर तुम्हाला सांगतिले तर? तुम्हाला थोडे आश्चर्य वाटले असेल ना? पण वाहतुकीचे नियम मोडूनही त्याचा दंड थकवल्याचे समोर आले आहे. मुंबई मिरर या इंग्रजी वृत्तपत्राने हे वृत्त दिले असून यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, परिवहन मंत्री दिवाकर रावते, आणि अभिनेता सलमान खान यांचा समावेश आहे.

महापौरांना या दंडाबद्दल माहितीच नाही

दरम्यान आपल्याला या दंडाबाबत काहीही माहीत नसून वाहनचालकाने वाहतूक नियम मोडले असे स्पष्टीकरण मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिले आहे.

- Advertisement -

एकूण ११९ कोटींचा दंड बाकी

सिग्नल तोडणे, नो एन्ट्रीमध्ये वाहन नेणे, झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे करणे यासाठी वाहतूक पोलिसांकडून दंड आकारला जातो. मुंबईमध्ये नियम मोडणाऱ्यांना  वाहतूक विभागाकडून ई चलान पाठवण्यात येते. त्या ई चलाननुसार जो दंड असेल तर तो वाहन मालकांना भरावा लागतो. मात्र मुंबईमध्ये ई चलानद्वारे पाठवण्यात आलेल्या दंडापैकी ११९ कोटींचा दंड येणे बाकी असल्याचे समोर आले आहे.

या नेत्यांनी थकवला दंड

विशेष म्हणजे दंड थकवणाऱ्यांची यादी तयार करण्यात आली असून या यादीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे, युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, अभिनेता सलमान खान, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, भाजपाचे नेते राम कदम यांची नावे आहेत. दरम्यान अभिनेता अर्जुन कपूर याने मात्र दंड भरल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -

ती कार आपण केव्हाच विकली

दरम्यान भाजपा प्रवक्ते राम कदम यांनी ज्या कारला दंड आकारण्यात आला आहे ती कार आपण केव्हाच विकल्याची माहिती मुंबई मिररला दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -