घरमनोरंजनशोमॅन राज कपूर यांच्या पत्नीचे निधन

शोमॅन राज कपूर यांच्या पत्नीचे निधन

Subscribe

बॉलिवूडचे शोमॅन दिवंगत राज कपूर यांची पत्नी कृष्णा राज कपूर यांचे आज पहाटे ४ वाजता निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर कपूर कुटुंबामध्ये शोककळा पसरली आहे. आज सायंकाळी चेंबूर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

बॉलिवूडचे शोमॅन दिवंगत राज कपूर यांची पत्नी आणि कपूर घरातील सर्वात वृद्ध महिला कृष्णा राज कपूर यांचे निधन झाले. त्या ८७ वर्षाच्या होत्या. आज पहाटे ४ वाजता त्यांनी शेवटचा श्वास घेतला. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाले. कृष्णा राज कपूर यांना ५ मुले आहे. त्यांच्या पश्चात रणधीर कपूर, रितू कपूर नंद, ऋषी कपूर, रिमा कपूर जैन आणि राजीव कपूर ही त्यांची मुले आहेत. याचबरोबर करीना कपूर खान, रणबीर कपूर, करिश्मा कपूर, अरमान जैन, निखिल नंद, रिध्दिमा कपूर साहनी, नाताशा नंदा आणि आधार जैन त्यांचे नातू आहेत. त्यांच्या निधनानंतर त्यांना बॉलिवूड मधील कलाकारांनी ट्विटरवरुन श्रद्धांजली दिली. कृष्णा यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर कपूर कुटुंबात एकच शोककळा पसरली. आज सकाळ पासून त्यांच्या चेंबूर स्थित घरात बॉलिवूड कलाकारांनी त्यांच्या अंतिम दर्शनासाठी हजेरी लावली. रणधीर कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी ५.३० वाजता चेंबूर येथील स्मशानभूमीत केला जाणार आहे.

राज कपूर आणि कृष्णा राज कपूर यांचे लग्न सन १९४६ मध्ये झाले होते. लग्नानंतर राज कपूर यांचे नाव त्यांच्या चित्रपटाच्या अभिनेत्रींशी जोडले जात होते. या कारणात्सव काही काळ कृष्णा विभक्त राहात होत्या. मात्र, राज कपूर यांच्या निधनांनतर कृष्णा यांनी घरची सर्व जावाबदारी स्वीकारली. त्यांच्या निधनानंतर अभिनेता आमिर खान, अनूपम खेर आणि सोहा अली खान यांनी ट्विटरवरुन श्रद्धांजली दिली. कृष्णा यांच्या निधनामुळे मोठे नुकसान झाले असल्याचे ट्विट आमिरने केले. तसेच दिग्दर्शक करण जोहर याने राज कपूर आणि कृष्णा यांचा एकत्र असलेला फोटो ट्विट केला आहे. ऋषी कपूर देशाबाहेर असल्यामुळे अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकणार नसल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -