घरमनोरंजनराज ठाकरे यांनी केले 'पानिपत' चित्रपटाचे कौतुक

राज ठाकरे यांनी केले ‘पानिपत’ चित्रपटाचे कौतुक

Subscribe

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना या पानिपत चित्रपटाचा ट्रेलर खुपच भावला असून त्यांनी यासाठी आशुतोष गोवारीकर यांचेही तोंडभरून कौतुक केले आहे.

दिग्दर्शक-निर्माता आशुतोष गोवारीकर यांच्या भव्यदिव्य आणि महत्त्वाकांक्षी पानिपत या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्यावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्या. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना या चित्रपटाचा ट्रेलर खुपच भावला असून त्यांनी यासाठी आशुतोष गोवारीकर यांचेही तोंडभरून कौतुक केले आहे. यासंबंधीचे ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, दिग्दर्शक आशुतोष यांचा मऱ्हाठा साम्राज्याच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या लढाईवरचा पानिपत चित्रपटाचा ट्रेलर पाहिला. ट्रेलरच इतका सुंदर आहे की चित्रपटाची लढाई आशुतोष जिंकणारच याची खात्री आहे, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी चित्रपटावर स्तुतीसूमन उधळली आहे. तसेच ट्रेलर पहाच पण चित्रपटदेखील नक्की पहा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

- Advertisement -

ऐतिहासिक घटनांना रुपेरी पडद्यावर साकारणारे दिग्दर्शक-निर्माता आशुतोष गोवारीकर यांच्या पानिपत चित्रपटात अभिनेता संजय दत्त, अर्जुन कपूर आणि अभिनेत्री क्रीती सिनॉन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर मोहनिस बेहेल, पद्मिनी कोल्हापुरे आणि झीनत अमान यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. १४ जानेवारी १७६१ या दिवशी लढल्या गेलेल्या पानिपतच्या युद्धावरचा हा चित्रपट बेतलेला आहे. जवळपास तीन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये अभिनेता संजय दत्तची दमदार एण्ट्री दाखवली आहे. चित्रपटात संजय दत्त अहमद शाह अब्दाली तर अर्जुन कपूर सदाशिवरावांच्या भूमिकेत आहे. अभिनेत्री क्रिती सिनॉन पार्वतीबाईंची भूमिका साकारत आहे. लगान, जोधा-अकबर, मोहेंजोदारोनंतर आता आशुतोष गोवारीकर पानिपत घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. येत्या ६ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

महाआघाडीबाबत शिवेसेनेकडून अधिकृत प्रस्ताव आलेला नाही – शरद पवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -