घरमुंबईशिवसेनेच्या डिजिटलवर पुन्हा राज ठाकरे

शिवसेनेच्या डिजिटलवर पुन्हा राज ठाकरे

Subscribe

राज ठाकरे यांचे सेनेच्या लेखी अजूनही महत्व कमी झालेले दिसत नाही. शिवसेनेला रामराम करीत त्यांनी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’ची स्थापना केली. या घटनेला आता बराच काळ लोटला असला तरी आजही शिवसेनेच्या लेखी राज यांचे महत्व टिकून आहे, असे सांगणारे डिजिटल स्क्रीन सेना भवनावर झळकू लागले आहे. मध्यंतरी हातावर टाळी देण्याचाच तर हा प्रकार नाही, अशी शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतीचा उध्दव आणि राज यांचा फोटो डिजिटलवर झळकू लागला आहे.

शिवसेनाभवनावर लावण्यात आलेल्या शिवसेनेच्या सेनेच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न डिजिटलद्वारे करण्यात आला आहे. असेच डिजिटल ‘मातोश्री’वर लावण्यात आले असून, तिथेही राज झळकत आहेत. या डिजिटलवर शिवसेनेचा आजवरचा प्रवास दाखवण्यात आला आहे. यात शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळापासूनच्या छायाचित्रांचा समावेश आहे. या छायाचित्रांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या तिघांच्या छायाचित्राचादेखील समावेश आहे. याशिवाय बाळासाहेब ठाकरेंच्या सभेत राज ठाकरे मंचावर असल्याचे छायाचित्रही स्क्रीनवर वारंवार येतात.

- Advertisement -

निवडणुका जवळ आल्या की उद्धव ठाकरे – राज ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी चर्चा नेहमी सुरु होत असते. राज ठाकरेंनी काही वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंना टाळीची साद घातली होती. आता पुन्हा एकदा विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना साद घालण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, अशी कुजबूज कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे. राजकारण काहीही असो. पण एकेकाळी शिवसेनेतील राज यांचे वजन या डिजिटलवरील छबींतून स्पष्ट दिसून येतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -