घरमुंबईराहुल गांधींना पंतप्रधान होऊ द्या - राज ठाकरे

राहुल गांधींना पंतप्रधान होऊ द्या – राज ठाकरे

Subscribe

'देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकदा संधी दिली. परंतु, मोदींनी देशाला आणखी खड्ड्यात घातले. त्यामुळे आता राहुल गांधी हा पर्याय आहे. राहुल गांधीला एकदा संधी द्यायला काय हरकत आहे? राहुल गांधीला पंतप्रधान होऊ दे', असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदींना २०१४ चर्या लोकसभा निवडणुकीवेळी देशाने पर्याय म्हणून पाहिले. नरेंद्र मोदींना लोकांनी संधी दिली. परंतु, नरेंद्र मोदींनी देशाला आणखी खड्यात घातले. त्यामुळे राहुल गांधींना पंतप्रधान होऊ द्या. त्यांना एकदा संधा द्यायला काय हरकत आहे?’, असे राज ठाकरे म्हणाले आहेत. यावेळी राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. ‘भाजप सरकारने नोटबंदी केल्यानंतर लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला’, असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे. शनिवारी मुंबईच्या शिवाजी पार्क येथे मनसेचा गुढीपाडवा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मोळाव्यादरम्यान राज ठाकरेंनी भाजप सरकारवर कडाडून टीका केली.

राज ठाकरे यांनी भाषण करताना HW या वेबपोर्टलचा एक व्हिडिओ दाखवला. या वेबपोर्टलने केलेल्या शोध पत्रकारितेत एक बाब उघड झाली होती की, सरकारी बॅंक जेव्हा तरुणांना कर्ज देते, तेव्हा प्रत्येक तरुणाला एका खाजगी कंपनीला पैसे द्यावे लागतात. १ हजार ८०० रुपये प्रत्येक कर्जामागे त्या कंपनीला द्यावे लागतात. ही कंपनी अहमदाबादच्या एका उद्योगपतीची आहे. त्याने २०१४ च्या लोकसभा निवडणुका दरम्यान विदेशातील नोकरीला राजीनामा देऊन भारतातील मोदी मोहिमेला पाठिंबा दिला होता. याच उद्योगपतीच्या खाजगी कंपनीला विनाकारण पैसे दिले जातात, असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे.

- Advertisement -

राज ठाकरे यांनी शनिवारी केलेल्या भाषणात मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली. अमित शहा आणि मोदी हे या देशावरील मोठे संकट असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे या संकटांतून देशाला बाहेर काढण्यासाठी आपण लोकसभा निवडणुकीच्या अगोदर प्रचारसभा घेणार. या प्रचारसभेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होत असेल तरी चालेल. पण या देशाला मोदीमुक्त करायचा आहे, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -