घरमुंबईराज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी - निरूपम

राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी – निरूपम

Subscribe

'राज ठाकरेंनी उत्तर भारतीय समाजाची माफी मागावी, तरच त्यांना उत्तर भारतीय समाज स्वीकारेल' अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी केली आहे. २ डिसेंबर रोजी कांदिवलीतील बुराभाई हॉल येथे उत्तर भारतीय महापंचायतीचा कार्यक्रम होणार आहे. यात प्रमुख वक्ते म्हणून राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

२ डिसेंबर रोजी कांदिवलीतील बुराभाई हॉल येथे उत्तर भारतीय महापंचायतीचा कार्यक्रम होणार आहे. यात प्रमुख वक्ते म्हणून राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी राज ठाकरे उत्तर भारतीयांशी संवाद साधणार आहेत. त्यावर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी ‘राज ठाकरेंनी उत्तर भारतीय समाजाची माफी मागावी, तरच त्यांना उत्तर भारतीय समाज स्वीकारेल’ अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी केली आहे. स्थापनेपासून मनसेनं कायम उत्तर भारतीयांविरोधात भूमिका घेतलेली आहे. रोजगाराच्या मुद्यावरून त्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण देखील केलेली आहे. त्यामुळे राज ठाकरे हे आता उत्तर भारतीयांशी संवाद साधणार असल्यानं त्याबाबत अनेक चर्चा देखील रंगल्या आहेत. त्यात आता संजय निरूपम यांनी राज यांच्याकडे माफीची मागणी केली आहे.

मराठीच्या मुद्यावर राजकारण करत राज ठाकरेंनी निवडणुका देखील लढवल्या. पण पक्षाची ताकद वाढण्याऐवजी ती कमी होताना दिसत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उत्तर भारतीयांची मते देखील तितकीच महत्त्वाची आहेत. त्यामुळे राज ठाकरे उत्तर भारतीयांशी संवाद साधणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे २ डिसेंबर रोजी राज ठाकरे नेमकं काय बोलणार? याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

- Advertisement -

वाचा – राज ठाकरे यांनी स्वीकारले उत्तर भारतीयांचे आमंत्रण

यापूर्वी राज ठाकरेंनी पुणे येथे जैन समाजाशी देखील संवाद साधला होता. यावेळी त्यांनी मासांहारी विरूद्ध शाकाहारी वादावर मनसेची भूमिका देखील स्पष्ट केली होती. त्यानंतर आता राज ठाकरे उत्तर भारतीयांशी संवाद साधणार आहेत. मराठीच्या मुद्यावर स्थापन झालेल्या शिवसेनेनं देखील आता राज्यात मराठी आणि देशात हिंदुत्वाची भूमिका स्वीकारली आहे. त्यात शिवसेना आता छटपुजेला देखील पाठिंबा देताना दिसत आहे. या साऱ्या पार्श्वभूमिवर मनसे आता भूमिका घेणार? आणि २ डिसेंबर रोजी राज ठाकरे काय बोलणार हे पाहावं लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -