घरमुंबईममताजींच्या भूमिकेला राज ठाकरे यांचा पाठिंबा

ममताजींच्या भूमिकेला राज ठाकरे यांचा पाठिंबा

Subscribe

पश्चिम बंगालमध्ये सीबीआय विरुद्ध बंगाल पोलीस असा संघर्ष झाला असून राजीव कुमार यांच्यावर केलेल्या कारवाईविरुद्ध ममता बॅनर्जी यांनी सत्याग्रहाला सुरुवात केली असून त्यांच्या या भूमिकेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

पश्चिम बंगालमध्ये सीबीआय विरुद्ध बंगाल पोलीस असा संघर्ष झाला असून राजीव कुमार यांच्यावर केलेल्या कारवाईविरुद्ध मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सत्याग्रहाला सुरुवात केली आहे. त्यांच्या या भूमिकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवला आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर एक पत्रक जारी करून आपला ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेला पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

letter
प्रसिद्धीपत्रक जाहीर

#SaveDemocracy
…केंद्राच्या एकाधिकारशाही विरोधात मा. ममता बॅनर्जी ह्यांनी जो आवाज उठवला आहे त्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या ह्या लढ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा मी जाहीर करतो. @MamataOfficial pic.twitter.com/tS0EonjYQj

- Advertisement -

— Raj Thackeray (@RajThackeray) February 3, 2019

- Advertisement -

मोदींवर केली टीका 

कोलकात्यामधील हायहोल्टेज ड्राम्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. राजकीय स्वार्थासाठी सीबीआयसारख्या स्वायत्त संस्थेचा बळी घेण्याचा प्रयत्न करू नये, अशी टीका राज ठाकरे यांनी पंतप्रधार नरेंद्र मोदींवर केली आहे. “राज्य सरकारला विश्वासात न घेता, सीबीआयने कोलकात्याच्या पोलीस आयुक्तांच्या घरावर छापेमारी केली. सीबीआयची स्वायत्तता संपुष्टात यावी यासाठी अलोक वर्मा प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे जे प्रकार केले ते देशाने पहिले. मात्र नरेंद्र मोदींनी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी सीबीआयसारख्या स्वायत्त संस्थेचा बळी घेण्याचा प्रयत्न करू नये”, अशा शब्दात राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींवर टीका केली.

काय म्हणाले राज ठाकरे 

“आपला देश संघराज्य आहे आणि राज्यांच्या अधिकारांवर घाला घालण्याचा कोणताही अधिकार केंद्र सरकारला नाही हे भाजप सरकारने विसरू नये. केंद्राच्या एकाधिकारशाही विरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जो आवाज उठवला आहे, त्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या ह्या लढ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा मी जाहीर करतो”, असही राज ठाकरे म्हणाले.

वाचा – पश्चिम बंगालमध्ये थरारक नाट्य,सीबीआय आणि पोलीस आमने सामने

वाचा – ‘राज ठाकरे म्हणाले कांदे फेकून मारा’

वाचा – पद्म पुरस्कार परत करण्याची अण्णांची तंबी; राज ठाकरे उद्या भेट घेणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -