घरमुंबई'त्या' मराठा आंदोलकांना नोकऱ्या कशा मिळणार? - राज ठाकरे

‘त्या’ मराठा आंदोलकांना नोकऱ्या कशा मिळणार? – राज ठाकरे

Subscribe

नवी मुंबई कामगार कर्मचारी सेनेच्या मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राजकारण तापलेले असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमके काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष होते. राज यांनी आज नवी मुंबई येथे ‘पालिका कामगार कर्मचारी सेने’च्या मेळाव्यामध्ये मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. आज मराठा आंदोलनात सहभागी झालेल्या साडे सात हजार तरुणांवर कलम ३०७ सारखे गंभीर गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती राज यांनी दिली. त्यामुळे आरक्षण मिळाल्यानंतरही या तरुणांना नोकरी कशी मिळणार? असा सवाल करत राज ठाकरे यांनी सरकारवर ताशेरे ओढले. गुन्हे दाखल करुन या तरुणांचे आयुष्य उध्वस्त करायचे, हा या सरकारचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर राज ठाकरे म्हणाले की, ‘मला काही तरी करायचे आहे हे स्वप्न पाहणारी मुले रस्त्यावर येतात आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात मग यांना नोकरी कोण देणार?’, असा सवाल राज यांनी यावेळी उपस्थितांना केला.

हिंसा करणारे परप्रांतीय

राज यांनी मराठा आंदोलनात हिंसा करणारे हे परप्रांतिय असल्याचे सांगत नवी मुंबईमध्ये जो हिंसाचार झाला त्यामध्ये ५६ जण हे परप्रांतिय होते ज्यांचा महाराष्ट्राशी काहीही संबध नसल्याचे त्यांनी म्हटले. त्याचबरोबर ‘आपल्याला आपला हक्क घेत असताना महाराष्ट्र बदनाम होता नये, याची प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी’, असाही सल्ला त्यांनी आंदोलनकर्त्यांना दिला.

- Advertisement -

रिक्त जागा भरायला या सरकारकडे पैसे नाहीत

देशातील एकूण २४ लाख जागा सरकारने भरलेल्या नाहीत. त्यामध्ये १० लाख शिक्षकांच्या जागा, ५ लाख ४० हजार पोलिसांच्या जागा रिक्त आहेत. मग गुन्ह्यात वाढ होणार नाहीतर काय होणार असे सांगत देशातील या रिक्त जागा भरायला सरकारकडे पैसे नसल्याचा आरोप राज ठाकरे यांनी यावेळी केला. तसेच एवढ्या जागा देशात उपलब्ध असताना आरक्षणाचा टाहो फोडने म्हणजे एकतर सरकारकडे पैसे नाहीत किंवा त्यांना या जागा भरायच्या नाहीत असा घणाघात राज यांनी यावेळी केला. तसेच कुणीही येतं आणि आपल्याला वेडे बनवून जातं असे सांगत राजकीय पक्ष फक्त राजकारण करतात असे देखील राज ठाकरे म्हणालेत.

मोदी-अमितशहांवरही राज यांची टीका

राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडगोळीवर देखील आज चांगलेच तोंडसुख घेतले. देशात एवढे गंभीर विषय असताना नरेंद्र मोदी योगा करतात आणि योगा संपल्यानंरत बॅग भरून निघून जातात, असे सांगत नोटाबंदीनंतर जवळपास साडेतीन कोटी नोकऱ्या गेल्याचा आरोप राज ठाकरेंनी यांनी यावेळी केला. तसेच मोदींसारखे पहारेकरी होऊ नका, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -