घरमुंबईभाजपच्या थैल्या घ्या आणि भाजप उमेदवारांना पाडा

भाजपच्या थैल्या घ्या आणि भाजप उमेदवारांना पाडा

Subscribe

लोकसभेच्या मतदानाचा फायदा भाजप सोडून ज्याला होईल त्याला होऊ द्या. भाजपचे लोक तुमच्याकडे येतील, त्यांनी तुमच्यासमोर थैल्या रिकाम्या केल्या तर ते घ्या, असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केले. लोकसभा निवडणूक लढणार नाही ही भूमिका मी आधीच मांडली होती, म्हणूनच विधानसभेसाठी जोमाने कामाला लागा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. ही लोकसभा निवडणूक कोणत्याही राजकीय पक्षाची नसून देश विरूद्ध नरेंद्र मोदी आणि अमित शहा अशी आहे. त्यामुळे जे करायच ते मोदी, शहाविरोधी करायचे, असेही ते यावेळी म्हणाले.

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी देश लुटला आहे, तुम्ही त्यांना लुटलं तर काहीही हरकत नाही. हा आदेश नाही, पण त्यासाठी भाजप कार्यालयाभोवती घुटमळत राहू नका असे सूचक वक्तव्यही त्यांनी यावेळी केले. देश या दोन व्यक्तींमुळे संकटात आहे. त्यामुळे देशासमोरच हे संकट दूर होणे गरजेच आहे. ही दोन माणस राजकीय क्षितिजावरून दूर झाली तरच पक्षाविरोधातली लढाई सुरू होऊ शकते. यापुढच्या काळात मी ज्या सभा घेईन त्या सभा नरेंद्र मोदी आणि अमित शहा विरोधी सभा असतील. येत्या गुढीपाडव्याला ६ एप्रिल रोजी कार्यकर्त्यांसाठी सविस्तर भाषण करणार असल्याचे स्पष्टीकरणही राज ठाकरे यांनी यावेळी दिले.

- Advertisement -

चौकीदाराच्या भानगडीत पडू नका. हे चौकीदाराच कॅम्पेन एकप्रकारचा सापळा आहे. जी वाट गेल्या साडेचार वर्षात लागली आहे, त्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी हे सगळ कॅम्पेन आहे असे ते म्हणाले. रतन टाटा यांच्या सांगण्यावरून मी गुजरातमधील प्रगती पाहण्यासाठी गेलो होतो. पण त्यावेळी मला सनदी अधिकार्‍यांकडून सगळी खोटी माहिती दिली गेली. गुजरात दौर्‍याच्या उत्तरार्धातही मी महाराष्ट्रच उद्योगात नंबर एक असल्याचे स्पष्ट केले होते. नरेंद्र मोदींसारखा खोटा पंतप्रधान मी आयुष्यात पाहिला नाही. माणूस बदलला की माझी भूमिकाही बदलणार असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले. पाच वर्षांत देशाचा पंतप्रधान म्हणून खूपच छोटा विचार नरेंद्र मोदी यांनी मांडला आहे. आपल्याला एका नवीन देशाची सुरूवात करणे गरजेचे आहे. राजकीय पक्ष हा देशपातळीवर बदलला तरच याची सुरूवात होऊ शकते असे राज ठाकरे म्हणाले. नरेंद्र मोदी आणि अमित शहा विरोधीच यापुढच्या काळातही प्रचार करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

काँग्रेस राष्ट्रवादीला विचारला जाब
विरोधी पक्षांनी एकत्र येऊन नरेंद्र मोदींविरोधात लढण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी हे माझे म्हणणे मी गेल्या पाडवा मेळाव्याला मांडले होते. शरद पवार आणि माझे भेटणे हा केवळ योगायोग होता. अजित पवार यांनाही भेटून युतीबाबतचा जाब विचारला ? आमच्यापैकी कोण बोलल, कोणी जागा मागितल्या, कोणी युतीचा प्रस्ताव मांडला या सगळ्यावर अजित पवार यांच्याकडे काहीच उत्तरे नव्हती. पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांच्याशी झालेल्या चर्चेतही माध्यमांसमोर का विनाकारण बोलत आहात असा जाब मी विचारला. लोकसभेसाठी मी इच्छुक नाही ही भूमिका आधीच स्पष्ट केली होती. मी जे करने त्यामध्ये कार्यकर्ता म्हणून तुमचाच फायदा आहे, असे सूचक विधान राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -