घरमुंबईराज ठाकरेंच्या राजकीय सर्जिकल स्ट्राईककडे सगळ्यांचे लक्ष

राज ठाकरेंच्या राजकीय सर्जिकल स्ट्राईककडे सगळ्यांचे लक्ष

Subscribe

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेच्या १३ व्या वर्धापन दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १३ वा वर्धापन दिन असून, संध्याकाळी ५.३० वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा वांद्रे येथील रंगशारदा हॉलमध्ये संपन्न होत आहे. मात्र या वर्धापन दिनाला विशेष महत्व आहे ते म्हणजे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका. त्यामुळे मनसेच्या या १३ व्या वर्धापन दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यातच पुलवामा हल्ल्यानंतर राज ठाकरे यांनी भाजपावर टीका केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपाच्या सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले होते. राज ठाकरे आता भाजपाच्या या टीकाकारांना काय बोलणार आहेत हे देखील पहाणे महत्वाचे ठरणार आहे. नेहमीच आपल्या व्यंगचित्रातून भाजप-शिवसेनेवर टीका करणारे राज ठाकरे आगामी लोकसभा आणि विधानसभेमध्ये झालेल्या भाजपा-शिवसेने युतीवर भाष्य करणार हे देखील तितकेच महत्वाचे ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीबाबत काय घेणार निर्णय

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मनसे महाआघाडीत जाण्यास तयार असून, काँग्रेसकडून अजूनही मनसेला विरोध होत आहे. त्यामुळे राज ठाकरे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये काय भूमिका घेणार आहे. हे देखील पहावे लागणार आहे. राज ठाकरे यांचे भाषण हे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नेहमीच उत्साह भरणारे असते. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर आलेला वर्धापन मनसे कार्यकर्त्यांमध्ये किती उत्साह भरणार आहे हे येणारा काळच ठरवेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -