घरमुंबईराजेंद्र गावितांचा शिवसेनेत प्रवेश; पालघरमधून दिली उमेदवारी

राजेंद्र गावितांचा शिवसेनेत प्रवेश; पालघरमधून दिली उमेदवारी

Subscribe

भाजपचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला असून पालघरमधून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

शिवसेनेने लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या उमेदवारांची यादी नुकतीच जाहीर केली होती. मात्र त्यामध्ये पालघर आणि सातारा या दोन जागांवरील उमेदवारांची नाव गुलदस्त्यात ठेवली होती. पालघर लोकसभेच्या जागेवरून शिवसेना कोणाला उमेदवारी देणार यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. अखेर हा सस्पेन्स आता संपला आहे. भाजपचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांनी आज, मंगळवारी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला असून पालघरमधून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खासदार गावित यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, श्रीनिवास वनगा यांना विधानसभेसाठी संधी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. राज्यात सर्वत्र ठिकाणी शिवसेना- भाजपचे जागावाटप झाले. मात्र, पालघरच्या जागेवरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये पालघरमध्ये खल होता. त्यावर आज तोडगा निघाला. यामुळे खासदार गावित हे आता शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर महायुतीचे उमेदवार म्हणून पालघर लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत.

- Advertisement -

काय म्हणाले राजेंद्र गावित 

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी चर्चा केली. त्यानंतर मी भाजपा सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र असं असलं तरीही माझ्यासाठी भाजपा आणि शिवसेनेचे कार्यकर्ते समान आहेत. पालघरमध्ये चांगलं काम करायचं आहे, अशी प्रतिक्रिया राजेंद्र गावित यांनी दिली आहे. भाजपात मी होतो, आता मी शिवसेनेत आलो आहे. मला दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समान आहेत, असंही गावित यांनी म्हटलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -