घरमुंबईVideo : सहा वर्षाची चिमुकली म्हणतेय, 'आरे वाचवा!'

Video : सहा वर्षाची चिमुकली म्हणतेय, ‘आरे वाचवा!’

Subscribe

आरे कॉलनीतील २७०० झाडे वाचवण्यासाठी संपूर्ण मुंबईकर एकत्र आले आहे. या झाडांचा जीव वाचावण्यासाठी सहा वर्षाच्या चिमुकलीने 'आरे वाचवा' असा नारा दिला आहे. या चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘मेट्रो ३’ प्रकल्पाच्या मेट्रो कारशेडसाठी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने आरे कॉलनीतील २७०० झाडे तोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर मुंबईकर नाराज आहेत. त्यामुळे अनेकांनी या निर्णयाचा निषेध केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करुन या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. याशिवाय अनेक सेलेब्रेटींनी पालिकेच्या निर्णयाचा विरोध केला आहे. बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर वृक्ष तोडीच्या निर्णया विरोधात रस्त्यावर आली होती. त्याचबरोबर अनेक बॉलिवूडमधील कलाकारांनी ‘आरे वाचवा’चा नारा दिला आहे. आता आरेसाठी अवघ्या सहा वर्षाची चिमुकलीने ‘आरे वाचवा’चा नारा दिला आहे. ही चिमुकली कॉमेडी स्टार राजपाल यादवची मुलगी आहे. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राजपालने स्वत: सर्वात अगोदर हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. ‘विकास महत्त्वाचा आहे पण त्याची किंमत एवढी मोठी चुकवायची? मुंबईत निसर्ग संपत्ती फार कमी आहे. तिथून आपल्याला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळते. त्यामुळे २७०० झाडे तोडण्याचा निर्णयाचा पुन्हा एकदा विचार करायला हवा’, असे राजपाल यादव ट्विटमध्ये म्हणाला.

- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांचा दोन दिवस कोकण दौरा; राणेंचा प्रवेश निश्चित?


आरे कारशेडला ८२ हजार स्थानिकांचा विरोध

दोन महिन्यांपूर्वी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने आरे यासंदर्भात जनसुनावणी आयोजित केली होती. त्यावेळी ८२ हजार स्थानिक नागरिकांनी आरे कारशेडला विरोध दर्शवला होता. आरे येथील वृक्षतोडीला त्यांनी विरोध दर्शवला होता. मात्र, तरीही मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने आरेतील २७०० झाडे तोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला विविध सामाजिक संस्था आणि संघटनांनी विरोध दर्शवला आहे. शिवसेनेने देखील या निर्णयावर विरोध दर्शवला होता. मात्र, तरीही आरे कारशेडसाठी २७०० झाडे तोडण्याचा निर्णय मान्य करण्यात आला. त्यामुळे नागरिकांच्या विरोधाचे रोषात रुपांतर झाल्यावर पालिका हा निर्णय मागे घेणार का? हा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -