घरमुंबईराकेश मारिया खोटे बोलत आहेत गुंड छोटा शकीलचा दावा

राकेश मारिया खोटे बोलत आहेत गुंड छोटा शकीलचा दावा

Subscribe

माजी आयपीएस अधिकारी आणि मुंबईचे पोलीस आयुक्त राहिलेल्या राकेश मारिया यांनी आपल्या ‘लेट मी से इट नाऊ’ या आत्मचरित्रात धक्कादायक खुलासे केले आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या गँगला अजमल कसाबला कोठडीत मारण्याची सुपारी मिळाली होती. पोलिसांनी ही माहिती सार्वजनिक होऊ दिली नाही, असा उल्लेख राकेश मारियांनी पुस्तकात केला आहे. त्यासंदर्भात आता दाऊदचा हस्तक राहिलेल्या गुंड छोटा शकीलने खुलासा केला आहे. कंपनीला कसाबची सुपारी मिळाली नव्हती. पुस्तकाचा खप वाढवण्यासाठी राकेश मारिया धादांत खोटं बोलत आहेत, असा दावा छोटा शकीलने केला आहे.

न्यूज 18 या वृत्तवाहिनीनं या संबंधीचे वृत्त दिले असून, छोटा शकीलने त्यांच्याकडे हा खुलासा केला आहे. प्रसिद्धीसाठी त्यांनी मनाला वाट्टेल ते लिहिले आहे. राकेश मारियांनी पुस्तकाचा खप वाढवण्यासाठी खोट्या वृत्ताचा आधार घेतला आहे. प्रसिद्धीसाठी ते फक्त दाऊद इब्राहिमच्या नावाचा वापर करत आहेत. खरे तर डी गँगचा अजमल कसाबशी कोणताही संबंध नाही. डी गँगला कसाबच्या हत्येची कोणतीही सुपारी मिळालेली नव्हती. राकेश मारिया यांनी आपल्या पुस्तकात उल्लेख केला आहे की, कोठडीत कसाबला मारण्याची जबाबदारी डी गँगला मिळाली होती.

- Advertisement -

दाऊदने कसाबची सुपारी घेतलेली, पण त्याला जिवंत ठेवायचेच होते. मारिया साहेबांच्या खोट्या विधानांसंदर्भात माझ्याकडे उत्तर नाही. जर ते भाईंच्या नावाने पुस्तकाचे प्रमोशन करत असतील तर गोष्ट वेगळी आहे. त्यांनी एखाद्या लहान मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगावं की हे सर्व खरे आहे. जर त्यांनी असे केल्यास त्यावर विश्वास ठेवता येईल. परंतु ते तसे करणार नाहीत. ते खोट्या दावांनुसार बुक प्रमोट करत आहेत. मला यापुढे काहीही बोलायचं नाही.

आज हिंदुस्थानात कोण खोटे बोलत नाही. खालपासून वरपर्यंत खोटेच बोलले जाते. सर्वच्या सर्व खोटारडे आहेत. तुम्हाला सगळेच माहिती आहे, तुम्ही मीडियावाले आहात. आता राकेश मारिया खोटं बोलले तर त्यात काय नवीन गोष्ट आहे. कसाब हा आमचा विषय नाही. त्यामुळे आम्हाला आयएसआय किंवा इतर कोणीही आदेश देऊ शकत नाही. अजमल कसाबच्या कोणत्याही प्रकरणात दाऊद इब्राहिम किंवा डी कंपनीचा कोणताही संबंध नसल्याचंही छोटा शकीलने स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -