घरCORONA UPDATECorona: पीएमसी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी राकेश वाधवान कोरोना पॉझिटिव्ह

Corona: पीएमसी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी राकेश वाधवान कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी राकेश वाधवान कोरोना पोजिटिव्ह असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात कैद असलेल्या राकेश वाधवान यांना ही लागण झाल्यामुळे त्यांच्यासोबत असलेल्या ५ कैद्यांना क्वारंटाईन केले असल्याची माहिती मिळत आहे. यासंबंधी तुरूंग अधिकारी दीपक पांडे यांनी सांगितले की, राकेश वाधवान यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राकेश वाधवान हे ६५०० कोटी रुपयांच्या पीएमसी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी आहेत.

हेही वाचा – गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्यांची मोफत चाचणी करा – नितेश राणे

- Advertisement -

जीटी हॉस्पिटलमध्ये दाखल 

राकेश वाधवान यांना जीटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी असलेल्या राकेश वाधवान यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने गेल्या आठवड्यात शुक्रवारी त्यांना जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. हॉस्पिटलमध्येच त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. सोमवारी वाधवान यांचा कोरोना चाचणी अहवाल आला असून त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांनतर त्यांना जी टी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. आता त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचे सांगितले जात आहे.

लॉकडाऊन असतानाहाी वाधवान कुटुंबियांसह २१ जण ५ गाड्यांमधून महाबळेश्वरला गेले असल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. या घटनेमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. पीएमसी बँक घोटाळ्यातील हे वाधवान बंधू कुटुंबियांसह तेव्हा पासून पाचगणीच्या एका हॉटेलमध्ये १४ दिवसांसाठी क्वारंटाइन होते. मात्र एप्रिल महिन्यात त्यांचा क्वारंटाइन काळ संपला असल्याचे गृहमंत्र्यांनी तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -