Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी राम कदमांना कार्यकर्त्यांच्या करिअरची चिंता, 'पोलिसांना मारहाण करणाऱ्यांवर माणुसकी दाखवा'

राम कदमांना कार्यकर्त्यांच्या करिअरची चिंता, ‘पोलिसांना मारहाण करणाऱ्यांवर माणुसकी दाखवा’

Related Story

- Advertisement -

पोलिसांना अमानुष मारहाण करणाऱ्या आरोपींना सोडण्यासाठी भाजप आमदार राम कदम यांनी पोलिसांना फोन केल्याचे समोर आले आहे. पोलिसांना मारहाण करणाऱ्या आरोपींना माणुसकी दाखवत सोडण्याची अजब मागणी राम कदम यांनी पोलिसांकडे केली आहे. आरोपींचं करिअर खराब होईल म्हणून त्यांना सोडून देण्यासाठी राम कदम यांनी कॉन्स्टेबल नितीन खैरमोडे यांना फोन केला. या फोनचा ऑडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नेमक काय आहे प्रकरण?

पवई पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल नितीन खैरमोडे यांना भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. दिपु तिवारी, सचिन तिवारी आणि आयुष राजभर असे या मारहाण करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. दरम्यान पवई हिरानंदानी येथे गॅलरिया मॉलजवळ एक ज्येष्ठ महिला डॉक्टरच्या गाडीला ट्रिपल सीट जात असलेले हे कार्यकर्ते धडकले. यावेळी घटनास्थळी असलेल्या पवई पोलिसांनी या तिघा आरोपींना ताब्यात घेतले. यादरम्यान रिक्षाने जात असताना कॉन्स्टेबल नितीन खैरमोडे यांना आरोपींनी रिक्षातच मारहाण केली. या मारहाणीत पोलीस नितीन खैरमोडे यांना गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी त्यांना रिक्षातून पळ काढला, पण मागे असलेल्या पोलिसांनी सचिनला पकडले. मात्र दिपु तिवारी आणि आयुष राजभर हे फरार झाले. पवई पोलीस सध्या या फरारी आरोपींचा शोध घेत आहेत.


- Advertisement -

हेही वाचा – प्रताप सरनाईक यांची गुरुवली येथील ७८ एकर जागा EDने घेतली ताब्यात


 

- Advertisement -